SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ काम करा आणि Ola Scooter मोफत मिळवा

मुंबई :

दिवसेंदिवस इंधनांच्या किमतीं वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर्सना, इलेक्ट्रिक स्कूटर्स हा चांगला पर्याय ठरत असून या स्कूटर्स पर्यावरणासाठी चांगल्या आहेत. शिवाय त्या वापरणे खिशालाही परवडण्याजोगे आहे. यामुळेच भारत सरकारही इलेक्ट्रिक स्कूटर्सवर भरीव सबसिडी देऊ करत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, जर एखादी विश्वसनीय कंपनी तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर चक्क मोफत देण्यास तयार असेल, तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगले काय असेल.

Advertisement

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ऑटो सेक्टरमधील विविध कंपन्या तगड्या ऑफर्स देत असतात. अशीच एक भन्नाट ऑफर ओला कंपनीने देऊ केली आहे. याअतंर्गत तुम्हालाही ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोफत मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागेल. ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर तुम्ही 200 किलोमीटर प्रवास एकाच चार्जिंगमध्ये करू शकला तर तुम्ही मोफत स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता.

ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी म्हटले आहे की, कंपनीला असे दोन रायडर्स मिळाले आहेत. यापैकी एका रायडरने MoveOS2 आणि एकाने 1.0.16 वर हा पराक्रम केला आहे, म्हणजेच कोणताही रायडर हा पराक्रम करू शकतो. जो कोणी विजेता होईल, त्यांना जूनमध्ये कंपनीचा Ola Futurefactory म्हटले जाईल आणि तेथे मोफत केशरी ओला स्कूटरची डिलिव्हरी दिली जाईल.

Advertisement

मागे काही ठिकाणी ओला स्कूटर्सला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर कंपनीने काही गाड्या परत मागवल्या. आता पुन्हा इमेज बिल्डींगसाठी कंपनीने ही ऑफर काढली असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement