SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी नोकऱ्यांचा महापूर येणार, नोकर भरतीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!

गेल्या कित्येक दिवसांपासून सरकारी नोकऱ्यांची दारेच बंद होती. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही राज्यातील अनेक तरुण घरीच हातावर हात ठेवून बसले आहेत. काही जण कुटुंबाच्या आर्थिक गरजेपोटी हाताला मिळेल ते काम करतात. नोकर भरती होत नसल्याने अनेकांनी विशेषत: मुलींनी मधूनच शिक्षणाला ‘गुड बाय’ केल्याची वस्तूस्थिती आहे..

राज्य सरकारी विभागांमध्ये गेल्या 6 वर्षांत मोठी पदभरती झालेली नाही. सद्यस्थितीत शासनाच्या 34 प्रमुख विभागांमध्ये तब्बल दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. गृह विभागात जवळपास 18 हजार, जलसंपदामध्ये 15 हजार, पशुसंवर्धन, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल, भूमी अभिलेख, पुरवठा विभाग, शिक्षण विभागात रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

Advertisement

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 60 हजार पदांची मेगाभरती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. मात्र, आता सरकारी नोकऱ्यांचा महापूर येणार आहे..

पदभरतीवरील निर्बंध हटवले

Advertisement

सध्या 34 प्रमुख सरकारी विभागांत दोन लाखांवर पदे रिक्त असली, तरी एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सरकारी नोकर भरतीवरील सर्व निर्बंधही राज्याच्या वित्त विभागाने उठविले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच पहिल्या टप्प्यात 70 हजार ते 90 हजार पदांची मेगा भरती होण्याची शक्यता आहे. सरकारी पदभरतीवरील सर्व निर्बंध वित्त विभागाने हटवले आहेत. सर्व विभागांनी त्यांच्याकडील मंजूर व रिक्त पदांच्या आकृती बंधास मान्यता घेऊन पदभरतीची कार्यवाही सुरु केली आहे.

Advertisement

राज्य सरकारी पदांची स्थिती

  • एकूण मंजूर पदे : 11,53,042
  • भरलेली पदे : 8,74,040
  • रिक्त पदांची संख्या : 2,06,303
  • वेतनावरील एकूण खर्च : 1.31 लाख कोटी

शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरवर्षी सरकारचा 1 लाख 31 हजार कोटी, ग्रॅच्युएटी व पेन्शनवर दरवर्षी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च होतो. एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदभरती ग्राह्य धरून तेवढ्या रकमेची तरतूद केल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात आले. आता आकृतीबंधास अंतिम मान्यता मिळाली, की ही पदभरती होणार असल्याचे समजते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement