SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हणून आज झटकन झाली सोन्याच्या दरात ‘एवढी’ वाढ

मुंबई :

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनानंतर अजून एका विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होतो न होतो तोच मंकीपॉक्स नावाच्या एका नव्या विषाणूच्या रुग्णांमध्ये जगभरात वेगाने वाढ होऊ लागल्याचे दिसून आले आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या संसर्गामुळे हैराण झाले असून मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित करण्याचा विचारही चालू आहे. याचा परिणाम जगभरातील व्यापारावर दिसून येत आहे. पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढली आहे.

Advertisement

याचे थेट पडसाद कमाॅडिटी बाजारावरही उमटले आहेत. कमाॅडिटी बाजारात सोन्याच्या किंमतीत जवळपास 300 रुपयांची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,845 रुपयांवर स्थिरावला. त्यात 301 रुपयांची वाढ झाली. सोन्याच्या दारात तेजी दिसून आली आहे मात्र चांदीच्या भावात मात्र वेगळीच गडबड झाली आहे. चांदीच्या सोन्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आहे. चांदीचे भाव कमी झाले आहेत. एक किलो चांदीचा भाव 61,421 रुपयांवर स्थिरावला. त्यात 143 रुपयांची घसरण झाली.

 

Advertisement

मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,845 रुपयांवर स्थिरावला. त्यात 301 रुपयांची वाढ झाली. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,050 रुपये इतका आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत 350 रुपयांची वाढ झाली. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,330 रुपये इतका वाढला. दिल्लीत सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,050 रुपये इतका तर 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 51,220 रुपये इतका आहे.

Advertisement