SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गुगल-पे’वरुन मोबाइल रिचार्ज करा नि कमवा बक्कळ पैसा; फक्त ‘इतकंच’ करा..!

आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी झाल्याचा आरोप होतो.. पण तो खरा नाही.. कारण तंत्रज्ञान आले, तसे कमाईची साधने बदलली.. या तंत्रज्ञानाच्या जोरावरच आज अनेक जण कोणतंही कष्टाचं काम न करता, अगदी घरबसल्या लाखो रुपये कमावतात..

आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वात मोठा अविष्कार म्हणजे, स्मार्टफोन..! मोबाईलमुळे सारे जगच मुठीत आले.. अनेक कामे क्षणात होऊ लागली.. स्मार्टफोन वापरायचा तर, तो रिचार्ज करणं आलंच.. ‘युपीआय’ (UPI) अॅपच्या मदतीने तुम्ही हा रिचार्ज करु शकता.. नि त्यातून मोठी कमाईही करु शकता..

Advertisement

आपल्या युजर्ससाठी ‘गुगल-पे’ (Google Pay)कडून आता तशी संधी देण्यात आली आहे.. ही कमाई नेमकी कशी करता येईल, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

कशी होते कमाई..?

Advertisement

मोबाईल रिचार्जद्वारे कमाई कशी होते, हे जाणून घेण्यापूर्वी आपण ‘गुगल-पे’ची कमाई कशी होते..? गेल्या काही दिवसांत भारतात ‘युपीआय’द्वारे पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. ‘युपीआय’द्वारे पैशांची देवाण-घेवाण केल्यास संबंधित कंपन्यांना त्याचं कमिशन मिळतं.. त्यामुळेच या कंपन्या ग्राहकांना ही सेवा मोफत देत असतात.

उदा. समजा तुम्ही ‘गुगल-पे’द्वारे ‘जिओ’ कंपनीचा कोणताही रिचार्ज केला, तरी ‘जिओ’ कंपनी ‘गुगल-पे’ला कमिशन देतं.. त्यामुळे आता ‘गुगल-पे’ दुकानदारांना हा व्यवसाय करण्याचा पर्याय देत आहे, म्हणजे दुकानदारांनी ‘गुगल-पे’ वापरून लोकांचे मोबाईल रिचार्ज केले, तर कमिशनचा काही भाग दुकानदारांनाही दिला जाणार आहे.

Advertisement

भारतात सर्वात मोठी ‘गुगल-पे’ची बाजारपेठ आहे. एका अहवालानुसार, ‘युपीआय’ (UPI) मार्केटचा 40 टक्के भाग ‘गुगल-पे’नेच व्यापला आहे, म्हणजे रोजच्या ​​व्यवहारांपैकी 40 टक्के व्यवहार ‘गुगल-पे’द्वारे केले जातात..

खरं तर ‘गुगल-पे’ हे ब्रोकर अॅप आहे, जे अगदी ब्रोकरसारखंच काम करते. त्यांचा संपूर्ण नफा कमिशनवर अवलंबून असतो. तुम्ही ‘गुगल-पे’ बिझनेस घेतल्यास, तुम्हालाही कमिशनचा काही भाग मिळू शकतो नि त्याद्वारे अगदी घरबसल्या कमीशनच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करु शकता..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement