SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कर्जवसुलासाठी ‘या’ बँकेची आयडिया; कर्जदारांच्या घरासमोरच…

उस्मानाबाद :

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषतः कोरोना काळात अनेक बँकांना झटका बसला. लोकांनी कर्ज फेडण्यास नकार दिले, काहींनी तसेच तंगवले. तर काही लोकांनी नव्याने कर्जाची मागणी केली. विविध बँक क्षेत्रातील संस्थाना हा ताळमेळ जुळला नाही, म्हणून अनेक बँका बंद झाल्या. मात्र सरकारी आणि मोठ्या असलेल्या बँकांना या काळात टिकणे, आवश्यक होते. मात्र तरीही वाढती (Bank Loan) कर्ज प्रकरणे आणि वसुलीबाबत ग्राहकांची उदासिनता यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि याच कारणामुळे आता अगदी विविध बँकांना आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देणे, मुश्कील झाले आहे. मात्र आता कर्जवसुलीसाठी एका बँकेने जबरदस्त शक्कल लढवली आहे.

Advertisement

उस्मानाबादच्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा मूळ स्त्रोत असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक ( DCC ) डबघाईला येत आहेत. त्यामुळे आता या बँकेने आणि कर्मचाऱ्यांनी एका अनोख्या पद्धतीने कर्जवसुली करण्याचे ठरवले आहे. शनिवारपासून बॅंकेचे कर्मचारी हे कर्जदारांच्या घरासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. कर्मचाऱ्यांची 27 पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी कर्जदारांच्या घऱासमोर बसणार आहेत.

यापूर्वी कधीही कोणत्याही बँकेने या पद्धतीने गांधीगिरी करत कर्जवसुली केलेली नाही. त्यामुळे आता ही पद्धत खरोखर उपयोगी ठरणार का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, बॅंकेची साखर कारखाने, बिगरशेती सहकारी संस्था, मजूर संस्था, प्रक्रिया संस्था एवढेच नाही तर पगारदार संस्थांकडेही थकबाकीचा आकडा हा वाढत आहे.वाढत्या थकबाकीमुळे बॅंकेकडूल रोख रक्कम ही पूर्णत: संपलेली आहे. बॅंकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या संस्थाकडील वसुलीसाठी कर्मचारी हे आता थकबाकीदारांच्या दरात वसुलीसाठी बसणार आहेत.

Advertisement