SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता रात्रीही तयार होणार सौर उर्जेपासून वीज? कोणत्या देशाने केला कारनामा, वाचा..

राज्यात विजेचा तुटवडा आणि उष्णतेमुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या अवकाळीने सगळीकडे नासधूस चालवलीय. अशा परिस्थितीत महिन्याला हजारो रुपये येणारे वीजबिल वर्षभरात खूप मोठा आकडा आपल्यासमोर उभा करते. वीजेचे दर देखील इंधनाच्या, गॅस सिलिंडरच्या दराप्रमाणे वाढतच आहेत. भविष्यात या किंमतीमुळे आणखी त्रासातून लोकांना जावं लागणार आहे. म्हणून सौर ऊर्जेचा पर्याय निश्चितच उत्तम आणि फायद्याचा ठरतो.

सौर उर्जेपासून बनविलेली वीज वापरू शकतो पण रात्री काही समस्या येऊ शकते. आपण ती साठवून ठेवता येत नसल्याने रात्री काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होतो. पण आता यावरही तज्ज्ञांनी उत्तर शोधून काढलंय. ऑस्ट्रेलियामधील एका इंजिनीअर्सच्या टीमने यावर एक उपाय शोधला आहे. रात्रीही सौरउर्जेपासून (solar energy) वीज तयार करून वापरता येऊ शकते. रात्रीच्या वेळी सामग्रीमधून उष्णता बाहेर पडली की वीज निर्माण होते. ऑस्ट्रेलियातील इंजिनीअर्सच्या टीमने हे तत्त्व अंमलात आणले आहे. हे तंत्र सामान्यतः रात्रीच्या काळोखात दिसण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गॉगलमध्ये सुद्धा वापरले जाते.

Advertisement

आतापर्यंत या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रोटोटाईपने फारच कमी ऊर्जा निर्माण केली आहे आणि लवकरच पर्यायी ऊर्जा स्त्रोत म्हणून विकसित होण्यास वेळ लागू शकतो, परंतु जर हे तंत्रज्ञान सध्याच्या फोटोव्होल्टेईक्स तंत्रज्ञानाशी जोडले गेले तर ते दिवसभरात गरम राहिलेला सोलार पॅनल रात्रीच्या वेळी थंड पडल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करू शकतो.

यंत्रणा काम कशी करते..?

Advertisement

सौर उर्जेपासून रात्री वीज करण्याच्या फोटोव्होल्टेईक्स या प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाश हा कृत्रिम पद्धतीने थेट विजेमध्ये रूपांतरित केला जातो. सौर ऊर्जा वापरण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. या अर्थाने, थर्मोरेडिएटिव्ह प्रक्रिया देखील असंच काम करते, ज्यामध्ये इन्फ्रारेड लहरींद्वारे अवकाशात जाणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर होतो.

जेव्हा कोणत्याही पदार्थातील अणूमधून उष्णता वाहते तेव्हा इलेक्ट्रॉन इन्फ्रारेड लहरींच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात. यामधून अत्यंत कमी क्षमतेने हलूहळू वीजनिर्मिती करता येते. यासाठी इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह एका दिशेने असणारे उपकरण आवश्यक आहे, ज्याला डायोड म्हणतात. यामध्ये, उष्णता गमावल्यावर इलेक्ट्रॉन खाली जमा होतात. संशोधकांनी मरकरी कॅडमियम टेल्युराइड (एमसीटी) पासून बनवलेल्या डायोडचा वापर करून पाहिला जो इन्फ्रारेड प्रकाश पकडण्यासाठी वापरला जातो. ऊर्जास्रोत म्हणून त्याचा प्रभावीपणे कसा वापर करता येईल हे आतापर्यंत माहीत नव्हते.

Advertisement

एमसीटी फोटोव्होल्टेइक डिटेक्टरने 20 अंश उष्णतेपर्यंत प्रति चौरस मीटर 2.26 मिलीवॅट घनतेची ऊर्जा उत्सर्जित केली. त्यामुळे कॉफीसाठी पाणीही उकळता येत नव्हते सध्याचे जर आपण थर्मोरेडिएटिव्ह डायोड बघितले तर ते अगदी कमी ऊर्जा देत आहेत. पण ही टेक्नॉलॉजी यापुढील येणाऱ्या काळात अधिक कार्यक्षम बनवता येईल. सध्या कमी उर्जेच्या रेडिएशनचा स्त्रोत म्हणून ग्रहाच्या थंड प्रक्रियेचा वापर करण्यासाठी काम चालू आहे, त्यापैकी एक या अभ्यासात केला गेला. या तंत्रज्ञानाची क्षमता वाढवल्याने बॅटरी बदलण्याची किंवा काढून टाकण्याची गरज दूर होऊ शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement