SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलच्या फायनल मॅचच्या वेळेत बदल, आता कधी होणार सामना?

आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामातील शेवटचे काही सामनेच बाकी असता मोठी बातमी समोर आली आहे. ठरलेल्या तारखेनुसार आयपीएलची फायनल ही 29 मे रोजी अहमदाबादला होणार आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण आता आयपीएलच्या फायनलची वेळ बदलण्यात आली आहे. आता आयपीएलची फायनल ही अन्य सामन्यांसारखी रात्री 7.30 वाजता सुरु होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.

आयपीएल 2022 (IPL 2022) ची फायनल मॅच यावेळी अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. इथपर्यंत आयपीएलचे सगळे सामने हे रात्री 7.30 वाजता सुरु व्हायचे. पण यंदाच्या वर्षी आयपीएलची फायनल मात्र उशिरा सुरु होतेय. त्यासाठी कारण हे आहे की, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी आता पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. आयपीएल उद्घाटनाला आणि समारोपाच्यावेळी बॉलिवूड तडक्याची परंपरा आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांच्या हंगामातही सांस्कृतिक सोहळा झाला नाही.

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, यंदा आयपीएल 26 मार्चला सुरू झाल्यावर तेव्हा उद्घाटन सोहळा होऊ शकला नव्हता. नंतर आयपीएल परिषदेने समारोप सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. अनेक सेलिब्रिटी, बॉलीवूडचे कलाकार या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय. हा सोहळा फायनल मॅचच्या वेळेपूर्वी 29 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सुरु झाल्यांनतर जवळपास 50 मिनिटे चालणार आहे, म्हणजेच हा सोहळा 7.20 वाजता संपणार आहे. त्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घेण्यात येणार आहे. या ब्रेकनंतर 7.30 वाजता टॉस करण्यात येणार आहे. टॉसनंतर पुन्हा एकदा अर्ध्या तासाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना 7.30 ऐवजी आता रात्री 8.00 वाजता सुरु होणार आहे.

प्ले ऑफचे वेळापत्रक:

Advertisement

क्वालिफायर-1 : 24 मे, सायं. 7.30 पासून (कोलकाता)
एलिमिनेटर : 25 मे, सायं. 7.30 पासून (कोलकाता)
क्वालिफायर-2: 27 मे, सायं. 7.30 पासून (अहमदाबाद)
फायनल : 29 मे, रात्री 8 वाजेपासून (अहमदाबाद)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement