SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्या-चांदीच्या भावात बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर वर-खाली होत आहेत. चांदीच्या भावातही सातत्याने बदल होत आहेत. लग्नसराई आणि विविध सण-उत्सवांमुळे सोन्याच्या चांदीच्या दरात बदल होत आहेत. तसेच जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता असल्याने धातूंच्या मार्केटमध्येही अस्थिरता आहे. काल सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. दरम्यान आता सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) पुन्हा तेजी दिसून येत आहे.

Advertisement

जागतिक तसेच भारतीय सराफा बाजारात (World Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी आली आहे. काल (गुरुवारी) सोनं 46,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. आज (शुक्रवारी) सोन्याचा भाव (Gold Price) 46,300 रुपये पर्यंत पोहचला. तसेच काल चांदी 61,000 रुपये होती. आज चांदीची किंमत (Silver Price) 65,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

असे आहेत महाराष्टातील मोठ्या शहरातील दर :-

Advertisement

पुणे – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये / 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,570 रुपये

मुंबई – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये / 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,510 रुपये

Advertisement

नाशिक -22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये / 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,570 रुपये

नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये / 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,570 रुपये

Advertisement