SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘झुंड’बाबत सुप्रिम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा..!

चित्रपट रसिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘झुंड’ चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे… मात्र, सुरुवातीपासून हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता..

आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटातून महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ची निर्मिती केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र, हा चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित होण्यापूर्वी कायद्याच्या कचाट्यात अडकला होता.

Advertisement

हैदराबादच्या चित्रपट निर्माता नंदी चिन्नी कुमार यांनी ‘झुंड’च्या विरोधात तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत कॉपी राइट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, तर 6 मे रोजी तो ‘ओटीटी’वर आला.

कुमार यांनी चित्रपट थिएटरमध्ये रिलीजवर मनाई घालण्याची मागणी केली होती. ‘झुंड’च्या निर्मात्यांविरूद्धच्या पूर्वीच्या खटल्यात सेटलमेंटच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप कुमार यांनी केला होता. तेलंगणा हायकोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात हा चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित करण्यास स्थगिती दिली होती..

Advertisement

हायकोर्टाच्या आदेशाविरोधात चित्रपट निर्माता ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी सीरीज)’ यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बी.आर. गवई आणि ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ‘झुंड’चे ‘ओटीटी’वर प्रदर्शन रोखण्यास नकार दिला. त्यामुळे ‘झुंड’च्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement