SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील पोलिस दलात मोठी पदभरती, बारावी पास तरुणांना नोकरीची संधी..!

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. गडचिरोली पोलिस विभागात ‘पोलिस शिपाई’ पदासाठी भरती (Police bharti 2022) निघाली आहे. या नोकर भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी 12वी पास उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

गडचिरोली पोलिस विभागात होत असलेल्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 136

या पदांसाठी भरती – पोलिस शिपाई

Advertisement

शैक्षणिक पात्रता

 • पोलिस शिपाई पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक.
 • नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले एसटी उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत वा जखमी झालेल्या पोलिस बातमीदार, पोलिस पाटील वा पोलिस कर्मचाऱ्यांची मुले सातवी उत्तीर्ण असले, तरी ते पात्र ठरतील. उमेदवार गडचिरोली जिल्ह्याबाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाहीत.

भरती शुल्क

Advertisement
 • खुला प्रवर्ग : 450 /- रुपये
 • मागास प्रवर्ग : 350 /- रुपये

आवश्यक कागदपत्रं

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

Advertisement

गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र, तसेच पोलिस मुख्यालय, गडचिरोली व पोलिस उपमुख्यालय.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 05 जून 2022

Advertisement

ऑनलाईन अर्जासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://gadchirolipolice.gov.in/

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement