SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्र सरकारची जबरदस्त योजना; 12 रुपयात होईल 2 लाखाचा लाभ

मुंबई :

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच जनतेसाठी फायद्याच्या योजना आणत असतात. आरोग्यापासून तर गुंतवणूकीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीवर सरकार काम करत असते. आता सामान्य लोकांच्या आरोग्याचे प्रश्न घेऊन काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक लोकोपयोगी योजना आणली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSVY) आहे.

Advertisement

या योजनेच्या माध्यमातून आपण अवघ्या 12 रुपयात 2 लाखांचा फायदा मिळवू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एका वर्षात 12 रुपये गुंतवावे लागतील. या विम्यात गुंतवणूक केल्यास, पॉलिसीधारकाला 2 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. अपघात झाल्यास, तुमच्या कुटुंबाला किंवा पॉलिसी नॉमिनीला 2 लाख रुपयांची मदत रक्कम मिळते. दुसरीकडे अपघातात विमाधारक अपंग झाल्यास, त्याला 1 लाख रुपयांची मदत रक्कम मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला आपल्या संबंधित बॅंकेच्या वेबसाईटवरुन लॉग इन करावे लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल.  या योजनेनुसार दरवर्षी 12 रुपये हे 25 -31 मे दरम्यान कापले जातात.

Advertisement

हे लोक घेऊ शकतात लाभ :-

  • प्रधानमंत्री विमा योजनेचा ( पीएमएसबीवाय) लाभ 18 ते 70 वर्षे वयातील लोक घेऊ शकतात. या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम केवळ १२ रुपये आहे. पीएमएसबीवाय पॉलिसीचा प्रीमियम थेट ग्राहकाच्या बँक खात्यातून कट केला जातो.
  • पॉलिसी खरेदी करतेवेळी ग्राहकाच्या बँक खात्याला पीएमएसबीवाय योजनेशी लिंक केले जाते. पीएमएसबीवाई पॉलिसीनुसार विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किवा अपंगत्व आल्यास दोन लाखांचा विमा कव्हर मिळतो.जर विमा खेरदी करणारा व्यक्तीला कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व आले असेल तर त्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. पीएमएसबीवाय योजनेत प्रीमियम कोणत्याही वेळी भरला जाऊ शकतो. येथे हे सुद्धा लक्षात ठेवावे की, मे महिन्याच्या अखेरीस विमा ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे नसतील तर विमा पॉलिसी रद्द होईल.

Advertisement