SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फुलपाखरू मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत! कोणासोबत बांधली लग्नगाठ..?

मराठी मालिका ‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे जी अनेक तरुण-तरुणींच्या Whatsapp Status वर पाहायला मिळते. तिला या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली. हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. आता दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला असून नुकतीच ती लग्नाच्या बेडीत अडकली असल्याचं दिसलं. या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हृता आणि प्रतीक या जोडीचा साखरपुडा मागच्या वर्षी 25 डिसेंबरला झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर लग्न करून तिने चाहत्याना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. आता लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हृताचे पती प्रतीक शाह हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या लग्नात अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत आणि मनोरंजन विश्वातील काही मान्यवरांनी हजेरी लावली होती.

Advertisement

हृताचे चाहते सोशल मीडियावरून हृता-प्रतीक यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, अभिनेत्री हृता दुर्गुळेने (Hruta Durgule Wedding) प्रतीक शहाशी (Prateek Shah) असलेल्या आपल्या नात्याची काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कबुली व ओळख करून दिली होती. हृताच्या लग्नाची खबर आता सोशल मीडियावर पसरू लागली. हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

‘मराठी सीरियल्स ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम पेजवरून हृता आणि प्रतीक यांच्या लग्नातील एक सुंदर फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये हृताच्या भांगेत कुंकू, हातामध्ये हिरवा चुडा व गळ्यात सुंदर मंगळसुत्र दिसत आहे. तसेच, या फोटोमध्ये सर्व ठिकाणची कलाकार मंडळी दिसत असून ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या लग्न सोहळ्याला काही मोजक्याच माणसांनी हजेरी लावली. यावेळी तिच्या आगामी ‘अनन्या’ सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रताप फड हजर होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement