SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आला रे आला, 30 मिनिटात 90% चार्ज होणारा ‘फोल्डेबल’ फोन आला

मुंबई :

सध्या मोबाईल कंपन्यांच्या मार्केटमध्ये स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक जण कमी पैशात जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे. एक काळ होता जेव्हा फोल्डेबल फोन यायचे. मधल्या काळात मात्र हे फोन बंद झाले होते. आता मात्र या फोल्डेबल स्मार्टफोनचे मार्केट पुन्हा वाढले आहे. एका नामांकित कंपनीने एक फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला असून आता तो मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत.

Advertisement

Mate Xs 2 नावाचे एक फोल्डेबल स्मार्टफोन मोडेल Huawei ने नुकतेच मार्केटमध्ये आणले आहे. महत्वाची बाब म्हणजे फोल्ड केल्यावर या 7.8 इंचाचा आहे तर फोल्ड नसताना हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा आहे. अजून एक भारी गोष्ट म्हणजे याचे वजन अवघे 255 ग्रॅम म्हणजेच हाताळण्यासाठी एकदम योग्य आहे. अनफोल्ड असूनही या स्मार्टफोनचा सर्वात स्लिम भाग फक्त 5.4 मिमी रुंद आहे. याचे वजन फक्त 255 ग्रॅम आहे.

 

Advertisement

8GB रॅम + 512GB स्टोरेजच्या Huawei Mate Xs 2 फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत यूरोपिय बाजारात €1,999 (1,62,602 रुपये) आहे. हा ब्लॅक, व्हाइट आणि वायलेट कलर ऑप्शन मध्ये आणि हा फोन जून मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोनची बॉडी एव्हीएशन ग्रेड टायटेनियम अलॉय, अल्ट्रा लाइट फायबर ग्लास आणि अल्ट्रा लाइट आणि सुपर स्ट्राँग स्टिलने बनवलेली आहे. याशिवाय, या डिव्हाइस मध्ये एक मायक्रोफायबर डिव्हाइसला समोर आल्यानंतर एक प्रीमियम फील देते.

 

Advertisement