SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईलबद्दल ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच नसतील माहिती; वाचून व्हाल अवाक्

अरे लहान होतो तेव्हापासून मोबाईल वापरतो. एकसुद्धा गोष्ट अशी नाही जी माहिती नाही, असे तुम्हाला आता वाटले असेल मात्र लक्षात घ्या, आपल्याला जसे दिसते तसे नसते. मोबाईलने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. आता हे वाचताना तुमच्यापैकी बहुतांश जण मोबाईलवर वाचत असतील. आणि मीही हे मोबाईलवरच लिहून अपलोड करत आहे. हाच मोबाईल आता आपली ओळख ठरवत आहे.

 

Advertisement

मोबाईल आता आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची संधी देत आहे कारण अगदी tiktok वापरून सुद्धा सेलिब्रिटी झालेले सामान्य लोक तुम्ही पाहिले असतील. ते सेलेब्रीटी या मोबाईलचीच देणं आहे. मोबाईलच्या या गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच माहिती नसतील त्या आपण जाणून घेऊयात.

 

Advertisement
  • ‘नोकिया 1110 हा फोन जुना आहे पण छावा आहे. ह्या मोबाईलने एक विश्वविक्रम केला आहे. नोकिया कंपनीने तब्बल 250 दशलक्ष मोबाईल विकले होते.
  • 1983 साली जगातील पहिल्या फोनची किंमत 258260 रु. एवढी होती. तो अमेरिकेत बनवला होता.
  • 2012 साली मोबाईल बनवणाऱ्या “ऍपल” कंपनीने एकाच दिवसात 3 लाख 40 हजार फोन विकले.
  • आपण वापरत असलेल्या मोबाईल फोन वर बाथरूमच्या हॅण्डल वर असलेल्या किटाणूपेक्षा १८ पटीने जास्त किटाणू आढळून येतात. त्यामुळे आपला फोन सुरक्षितपणे हाताळा. शिवाय क्लीनरने स्वच्छ सुद्धा करा.
  • मोबाईल मधल्या रेडिएशनमुळे “निद्रानाश, डोकेदुखी, तणाव आणि गोंधळ’ निर्माण होतो.

 

  • जगातील 1973 साली पहिला मोबाईल फोन कॉल केला गेला.
  • सध्या वापरात असलेल्या फोनची कम्पुटिंग पॉवर ही चंद्रावर पाठवण्यात आलेल्या ‘अपोलो 11’ यानासाठी वापरण्यात आलेल्या पॉवर पेक्षा जास्त आहे.
  • 70% फोन हे चीनमध्ये तयार होतात.
  • जगात असलेल्या लोकसंख्येच्या 80% लोकांकडे मोबाईल फोन आहेत.
  • सरासरी दिवसातून 110 वेळा मोबाईल युजर आपला फोन अनलॉक करीत असतो.

Advertisement