SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता घरबसल्या मोबाईलवरच करा ई पीक पाहणी; आपत्तीमध्ये सहज मिळवा सरकारी मदत

मुंबई :

शेतकरी राब राब राबून आपली शेती पिकवतो पण अनेकदा पीक जोमात असताना विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ते नष्ट होते किंवा पिकाचे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देते, परंतु ही मदत मिळताना अनेकदा अडचणी येतात. त्यातही बरेच गैरप्रकार होतात. कधी कधी तर शेतकरीही लबाडी करतात त्याचा तोटा मात्र निरागस आणि निष्पाप अशा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

Advertisement

2019 आणि 2021 या काळात शेतकऱ्यांना आपत्ती मदती दरम्यान बऱ्याच अडचणी आल्या. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याने आपल्या शेतात कोणते पिक लावले आहे, यामध्ये बऱ्याच शंका घेण्यात आल्या. यावर उपाय म्हणून सरकारने इ-पीक पाहणी हे अॅप काढले आहे.

गेल्या वर्षापासून शासनाने माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचे आधारे पीकपाणी करण्यासाठी गेल्या 15 ऑगस्टपासून सुरूवात केली. हा प्रकल्प संयुक्तपणे राज्याचा महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. सरकारच्या या प्रकल्पाला बरेच शेतकरी प्रतिसाद देत आहेत.

Advertisement

आपण घरबसल्या आता मोबाईल वर देखील ही पीक पाहणी नोंदवू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोबाईल मधील google play store वर जाऊन e pik pahani हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. आणि पुढे प्रोसेस फॉलो करून योग्य ती माहिती भरावी लागेल.

अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. जेणेकरून आपली सर्व माहिती तारखेसोबत शासन दरबारी उपलब्ध राहते. जर कदाचित दुर्दैवाने एखादी नैसर्गिक आपत्ती येवून नुकसान झाले तर आपल्याला या ई पीक पाहणीच्या आधारे सरकारी मदत सहजतेने मिळू शकते.

Advertisement