SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’..!! अतिरिक्त उसाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

महाराष्ट्रात यंदा अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. मे महिना अर्धा सरला, तरी लाखो शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तसाच उभा आहे. राज्यात यंदा ऊसाचे बेसुमार उत्पादन झाले. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 2.25 लाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र यंदा जास्त आहे. त्यामुळे राज्यात अजूनही 13 लाख 67 हजार हेक्टरवर ऊस (sugarcane) शिल्लक आहे.

साखर कारखान्यांचे गाळप अजूनही सुरु असले, तरी हा सारा ऊस तोडला जाण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी बीडमधील शेतकऱ्यांने उसाला आग लावून स्वत: आत्महत्या केली. ऊसउत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर राज्य शासनाला आता खडबडून जाग आलीय..

Advertisement

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील अतिरिक्त उसाबाबत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 1 मे नंतर गाळप होणाऱ्या उसाला टनामागे 200 रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, प्रति टनामागे वाहतुकीसाठीही पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात यंदा मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत दिले.

Advertisement

तिजोरीवर 100 कोटींचा भार
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, की “राज्यात 1 मे नंतर गाळपाचा राहिलेला अंदाजे 52 लाख टन ऊस होता. पैकी आजअखेर 32 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. 1 मे नंतर गाळप होणाऱ्या उसाला 200 रुपये, तसेच 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या उसाला टनामागे 5 रुपये अनुदान देण्यात येईल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटींचा भार पडणार आहे..”

मागील वर्षापेक्षा यंदा रोज सुमारे 55,920 टन जास्त गाळप होत आहे. गेल्या वर्षी या तारखेला 1013.31 लाख टन गाळप झाले होते. यंदा 287.31 लाख टन गाळप जास्त झालेय. विशेषत: बीड, जालना, नगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिलेला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement