अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच चहा पिण्याची सवय असते. सकाळी सकाळी ताजेतवाने वाटावे, यासाठी रिकाम्या पोटी चहा पितात, ज्याला ‘बेड टी’ असेही म्हटलं जातं. शहर असो की गाव.. सध्या कित्येकांच्या घरांमध्ये ‘बेड-टी’ कल्चर पाहायला मिळतं..
एका अहवालानुसार, भल्या सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. रिकाम्या पोटी चहा पिण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
आरोग्यावर होणारा परिणाम
थकवा नि चिडचिड – सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. उलट असं केल्याने पूर्ण दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे तुमचा मूडही खराब होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहाचे सेवन करू नये.
पचन क्रियेवर परिणाम
रिकाम्यापोटी चहा पिण्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांना नुकसान पोहचते. आपल्या आरोग्य आणि विशेषत: पचन क्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी या बॅक्टेरियासाठी महत्त्वाची भूमिका होते. पचन क्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी आम्हाला रिकाम्यापोटी चहा पिणे टाळले पाहिजे
श्वासाची दुर्गंधी – रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडीटी व तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा पिणं शक्यतो टाळावे.
हृदयविकाराचा धोका – उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी कधीही ‘बेड टी’ घेऊ नये. कारण, त्यातील ‘कॅफिन’ शरीरात विरघळताच, रक्तदाब वाढतो. त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका संभवतो.
मधुमेहाचा धोका – रिकाम्या पोटी चहा पिण्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.. शरीरातील अनेक पेशींना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे दीर्घ काळ मधुमेहाचा धोका वाढतो.
अल्सरची भीती – सकाळी रिकाम्या पोटी गरम चहा पिण्यामुळे पोटाच्या आतील भागाला इजा होऊ शकते. त्यामुळे अल्सर होऊ शकतो.
टीप – वरील लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा..