SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“अबे बुढ्ढे दोपहर हो गयी..”, अमिताभ बच्चन यांच्याविषयी ‘हे’ काय घडलं..?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर कविता, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या व्यतिरिक्त ते बऱ्याच वेळा त्यांचे विचार मांडताना किंवा चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतात.

नेमकं प्रकरण काय..?

Advertisement

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून फॅन्सना “प्रात: काल की शुभकामनाएँ !” म्हणजेच ‘शुभ सकाळ’ म्हणत शुभेच्छा देतानाची पोस्ट शेअर केली. तर यावर एका नेटकऱ्याने अजब रिप्लाय देत “अबे बुढ्ढे दोपहर हो गयी” अशी आश्चर्यकारक टिप्पणी केली केली.

बिब बी यांनी ती कमेंट पाहिली आणि अतिशय शांतपणे आणि मिश्कीलपणे उत्तर देत म्हणाले, ‘”आप चिर आयु हों, मेरी प्रार्थना, और ईश्वर करे तब आप को लज्जित करते हुए कोई भी आपको बुड्ढा न कहे!”, (‘मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की, तुमचे वय वाढल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हातारा म्हणू नये.’) असं अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.

Advertisement

तर एका दुसऱ्या नेटकऱ्यानं बिग बींच्या पोस्टला कमेंट केली, ‘तुम्हाला असं नाही वाटत का की खूप लवकरच तुम्ही सुप्रभात ही पोस्ट शेअर केली.’ यावर बिग बी म्हणाले, ‘तुम्ही मारलेल्या टोमण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण मी रात्री उशिरापर्यंत शूटिंग करत होतो, ती आज सकाळी संपली. त्यामुळे मला उशिरा उठल्याने सुप्रभात करायलाही उशिर झाला. म्हणून तुमची माफी मागतो.”, अशी कमेंट करत हुशारीपणाने आपल्या पदरी आलेला अपमान टोलवून लावत अमिताभ यांनी नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं.

दरम्यान, अमिताभ बच्चन गेल्या कित्येक दशकांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपला अनुभव आणि अभिनयाचा ठसा आजपर्यंत उमटवत आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्यापासून अनेक नवखे कलाकार काही गोष्टी शिकत असतात. बिग बी यांना अनेक लोक आदराने हाक मारत असतात भले ते ऑनलाईन असो की ऑफलाईन. यामुळे अशा बड्या अभिनेत्याला ही वागणूक मिळणं सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अत्यंत वाईट बाब समजली जात आहे. बिग बी यांचा नुकताच ‘झुंड’ हा चित्रपट रिलीज झाला असला तरी या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्याचा आणखी एक चित्रपट तो म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement