SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गुगल’ बंद करणार तब्बल 9 लाख अ‍ॅप्स, मोबाईलधारकांवर होणार ‘असा’ परिणाम..!

माेबाईल वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी ‘गुगल’ने ‘कॉल रेकॉर्डिंग’साठी वापरले जाणारे ‘थर्ड पार्टी अ‍ॅप्स’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मोबाईल युजर्सच्या सुरक्षेच्या कारणामुळे ‘गुगल प्ले स्टोअर’च्या धोरणांमध्ये सातत्याने बदल केले जातात. त्यानुसार हा निर्णय घेतला होता.

‘गुगल’ने (Google) आता तर त्यापेक्षा मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे येत्या काळात ‘गुगल प्ले स्टोअर’वरुन सुमारे 9 लाख अ‍ॅप्स हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘गुगल’ने एक योजनाच हाती घेतली आहे. त्यातील काही अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये देखील ‘इन्स्टॉल’ केलेले असू शकतात.

Advertisement

9 लाख ‘अ‍ॅप्स’ हटवणार…
‘गुगल’कडून सातत्याने ‘अ‍ॅप’ अपडेट करण्याबाबत सूचना केल्या जातात. मात्र, त्यानंतरही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. त्यामुळे असे अपडेट नसलेले सुमारे 9 लाख ‘अ‍ॅप्स’ आता ‘गुगल प्ले स्टोअर’वरून काढून टाकले जाणार आहेत. त्यामुळे ‘गुगल प्ले स्टोअर’वरील अ‍ॅप्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.

‘अ‍ॅपल’नेही आपल्या ‘अ‍ॅप स्टोअर’वरील गेल्या दोन वर्षांत अपडेट न झालेल्या ‘अ‍ॅप्स’ना काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ‘गुगल’नेही तसेच पाऊल उचललं आहे. हे अ‍ॅप्स नव्या ‘एपीआय’ आणि पद्धतीचा वापर करीत नसल्याने ते जास्त सुरक्षित नाहीत. त्यामुळे युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन ‘गुगल’ आणि ‘अ‍ॅपल’नं हा मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

अपडेट न केलेले अ‍ॅप्स ‘गुगल प्ले-स्टोअर’वरून लपवले जाणार आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात युजर्सना हे अ‍ॅप्स ‘डाउनलोड’ करता येणार नाहीत. शिवाय अनेक ‘अ‍ॅप्स’ तुमच्या मोबाईलमध्ये असू शकतात. मात्र, आता ते वापरता येणार नाहीत.

या मोबाईलमध्ये होणार काॅल रेकाॅर्डिंग
दरम्यान, ‘गुगल प्ले स्टोअर’च्या (Google Play Store) पॉलिसीनुसार, आता ‘थर्ड पार्टी अ‍ॅप्स’ना कॉल रेकॉर्डिंगसाठीची परवानगी मागता येणार नाही. त्यामुळे ट्रू-कॉलर, ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर, क्यूब एसीआर व अन्य लोकप्रिय अ‍ॅप बंद होऊ शकतात. मात्र, ज्या मोबाईलमध्ये ‘डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग’ सुविधा आहे, ती सुरु राहणार आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement