SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चाणक्य नीति : ‘अशा’ लोकांना कधीही मदत करु नका, तुमचंच नुकसान होईल..!

महान अर्थतज्ज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली. त्यात संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करीत असल्याचे मानले जाते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात कधीही तीन प्रकारच्या लोकांना मदत करू नये, ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला हानी तर पोहोचतेच, शिवाय तुमच्या अडचणीही वाढू शकतात.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

कोणाला मदत करु नये..?

मूर्ख व्यक्ती : आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, माणसाने नेहमी मुर्खांपासून दूर राहावे. अशा लोकांना ज्ञान देणं, म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्यासारखं आहे. मूर्खाच्या कल्याणाचा विचार केला, तरी तो निरर्थक युक्तिवाद ठरतो. मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणं म्हणजे वेळ नि शक्ती वाया घालवणे मानले जाते.

Advertisement

मूर्खांना स्वत:ची विचारक्षमता नसते. तुम्ही जे मार्गदर्शन करता, ते या कानाने ऐकतात नि दुसऱ्या कानाने सोडून देतात. शिवाय, आपण कसे बरोबर आहोत, हे पटवून देतात. त्यामुळे मूर्ख माणसाला कधीही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये..

चारित्र्यहिन व्यक्ती : चारित्र्यहिन लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करावा. अशा लोकांसोबत तुमची प्रतिमाही डागाळू शकते. समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. तुमचे चारित्र्य कितीही स्वच्छ असले, तरी ते डागाळू शकते. त्यामुळे नेहमी वाईट चारित्र्याच्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य देतात.

Advertisement

विनाकारण दुःखी व्यक्ती : विनाकारण दुःखी असणारी व्यक्ती नेहमी इतरांच्या प्रगतीचा हेवा करते. त्यांच्यात मत्सराची भावना असते. अशी व्यक्ती तुम्हालाही मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. अनेक जण श्रीमंत, सक्षम असले, त्यांना सतत रडायची सवय असते.

अशा विनाकारण दुःखी असलेल्या व्यक्तीपासून नेहमी अंतर ठेवावे. अशा लोकांना नेहमी इतरांचा फायदा कसा घ्यायचा हे माहित असते आणि ते काम संपल्यानंतर तुम्हाला सोडून जातात, असे चाणक्य म्हणतात.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement