SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल. कामाचा ताण कमी राहील. अचानक मोठी संधी चालून येईल. त्यात फायदा होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर हमखास यश मिळेल. कायद्याची बंधनं पाळा. अचानक धनलाभ होईल. थोडा संयम ठेवलेला बरा.

वृषभ (Taurus): रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. आर्थिक बाजू बळकट राहील. महत्त्वाच्या कामात व्यस्त राहाल. काही अडचणी येतील. कामाचा ताण वाढेल. दगदग कमी होईल, अशा बेताने कामे करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. चांगली परिस्थिती राहील.

मिथुन (Gemini) : आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. ग्रहमान अनुकूल राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरात किरकोळ कारणावरून गैरसमज होतील.

कर्क (Cancer) : तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो. तुम्ही सकाळपासूनच चांगल्या बातमीची वाट पाहत आहात. कदाचित फिरावे लागेल. नवीन लोकांशी संपर्क वाढवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. प्रवास शक्यतो टाळलेला बरे राहील.

Advertisementसिंह (Leo) : प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जवळचा प्रवास होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. कामांची यादी बनवून प्राधान्यक्रम ठरवून कामं करा. भावंडांच्या भेटी होतील. त्यांच्यासमवेत वेळ मजेत जाईल.

कन्या (Virgo) : तुमच्यापैकी काहीजण अध्यात्म आणि ध्यानात मन लावतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना बनू शकते. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री चांगली होईल. आर्थिक उलाढाली फायदेशीर ठरतील. अकल्पित लाभ होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल.

तुळ (Libra) : नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील. कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. विविध क्षेत्रांत सफलता मिळेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. मनासारखे भोजन मिळेल. कामात उत्साह राहील. लोकांच्या संपर्कात राहाल. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. आर्थिक आवक चांगली राहील.

वृश्‍चिक (Scorpio) : तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता वाढेल. आज कामावर दांडी मारून करमणूकीस प्राधन्य द्याल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात आगेकूच सुरू राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. सरकारी कामात यश मिळेल. अनेकांची मदत मिळेल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल.

Advertisement


धनु (Sagittarius) : तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. अनावश्यक कामाचं दडपण घेऊ नका. क्षुल्लक कारणावरून स्वत:ला त्रास होईल, असं वागू नका. प्रवास शक्यतो टाळा. वाहनं जपून चालवा. वेगावर मर्यादा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणं टाळा.

मकर (Capricorn) : तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. जास्त खोलात जाऊ नका. लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. प्रवासाचा योग येईल. भेटवस्तू मिळतील.

कुंभ (Aquarious) : कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी, ते काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सफल होतील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. नवीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.

मीन (Pisces) : मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. मुलांची काळजी लागून राहील. नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. मनावरचा ताण हलका होईल. पूजापाठ करण्यात मन रमेल. भाग्याची चांगली साथ राहील. अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासकार्य साधक ठरेल. फार दगदग होईल अशी कामं करू नका. आराम करा.

Advertisement