SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केतकी चितळेबाबत कोर्टाचा महत्वाचा निर्णय, केतकीनं स्वत:च केला ‘असा’ युक्तिवाद..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत ‘फेसबूक’वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे कोर्टाने 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केतकीविरोधात राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याने तिच्या अडचणीत वाढ झालीय.

रविवारी सकाळी केतकीला ठाण्यातील सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतःच कोर्टात युक्तिवाद केला. त्यावेळी तिने आपल्या पोस्टवर ठाम असल्याचे कोर्टाला सांगितले.. केतकीने तिची बाजू इंग्लिशमध्ये कोर्टात मांडली..

Advertisement

पोस्ट डिलिट करणार नाही…
ती म्हणाली, की “ती पोस्ट माझी नाही. मी ती सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का?” असा सवाल करतानाच तिनं सांगितलं, की “मी ती पोस्ट डिलीट करणार नाही, कारण माझा तो अधिकार आहे..”

केतकीनं अशी पोस्ट का केली, कुणाच्या सांगण्यावरून केली, या मागे कोणाचा हात आहे का, याचा शोध घ्यायचा असल्याचे सांगत ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोर्टाकडे 5 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली.

Advertisement

त्यावर केतकी म्हणाली, की “मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली, ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. मी काही ‘मास लिडर’ नाहीये, की माझ्या काही लिहिण्यानं राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल..!”

दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यावर कोर्टाने केतकीला 18 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, गोरेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारीही केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झाले होते.

Advertisement

मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात, अमरावतीतल्या गाडगे नगर पोलिस ठाण्यात, नाशिक सायबर पोलिस ठाण्यातही केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं तिच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

केतकीवर शाईफेक
केतकी चितळेच्या (ketaki chitale) फेसबूक पोस्टमुळे ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना काही कार्यकर्त्यांनी केतकीच्या अंगावर अंडी व शाईफेक केली. शिवाय, राज्याच्या विविध भागात रविवारी दिवसभर राष्ट्रवादीतर्फे केतकीविरोधात आंदोलने करण्यात येत होती.

Advertisement

केतकी चितळेच्या पोस्टमुळे राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी केतकीच्या पोस्टबाबत नाराजी व्यक्त करताना त्याचा निषेध नोंदवला..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement