भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) च्या 2019 च्या आकडेवारीच्या आधारे देशात विमा योजना खरेदी करणाऱ्यांची संख्या जगातील सर्वाधिक कमी देशांपैकी एक म्हणजेच 3.69 % इतकी आहे. इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या अहवालानुसार ही संख्या 2023 पूर्वी 5.3% च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढेल असं सांगितलं जात आहे.
बाजारात विविध विमा योजना असताना योग्य योजना निवडणे अवघड होऊ शकते. कोरोना काळात टर्म इन्शुरन्स घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. विमा योजना असंख्य असून तुमच्यासाठी विमा योजना घेताना टर्म इन्श्युरन्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
टर्म इन्शुरन्स काय आहे..?
टर्म इन्शुरन्स (Term Insurance) हा विशिष्ट कालावधीसाठी कव्हर देतो. या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वेळेत जर विमाधारकाचे निधन झाले तर Death Benefit दिला जातो. समजा असे झाले नाही तर, टर्म इन्शुरन्स विम्याची मुदत संपल्यावर तो रिन्यू केला जाऊ शकतो.
भारतात ही योजना 18 ते 65 वयोगटातील लोकांसाठी आहे. विमा योजनेची मुदत 5-50 वर्ष असू शकते. तसेच सम अशुर्ड रक्कम 20 लाख रुपयांपासून 1 कोटी किंवा त्याहून जास्त असण्याची शक्यता आहे.
पॉलिसीचे रिन्यू करताना प्रीमियमची रक्कम पॉलिसीचे मूल्य (पेआउट रक्कम) आणि विमाधारकाचे वय, आरोग्य, लिंग, पूर्व-अस्तित्वातील वैद्यकीय परिस्थिती आणि सर्वसाधारणपणे वैद्यकीय इतिहास अशा काही गोष्टींच्या आधारे पुन्हा मोजली जाते. या सर्व माहितीची पडताळणी करण्यासाठी सामान्यपणे वैद्यकीय तपासणी करून विमा कंपनीला विमाधारकाचा व्यवसाय, धूम्रपानाच्या सवयी, कौटुंबिक इतिहास इत्यादी माहिती असणे गरजेचे असते.
फायदे काय…?
▪️ तुमचा परतावा भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत अधिक असू शकतो.
▪️ कलम 80 सी आणि कलम 80 डी अंतर्गत भरलेल्या टर्म इन्शुरन्स प्रीमियमवर कर सवलत मिळू शकते.
▪️ पारंपारिक जीवन विमा योजना तुमच्याकडून कव्हरेज रकमेच्या 7-10 % प्रीमियम म्हणून आकारतात. जर वार्षिक प्रीमियम 10,000 रु. असेल तर त्या योजनेचे कव्हरेज म्हणजेच विमा संरक्षण फक्त रु. 1 लाख असते. पण या तुलनेत टर्म इन्शुरन्स सर्वसाधारणपणे 10 ते 20,000 रु. मधील प्रीमियम वर मोठा दिलासा देत 1 कोटी रुपयांपर्यंतचे कव्हरेज म्हणजेच विमा संरक्षण मिळू शकते.
▪️ जर गंभीर आजाराचा टर्म इन्शुरन्स योजनेत समावेश केला तर रुग्णांचे निदान झाल्यावर एकरकमी पेआउट मिळते..
पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या..?
भारतातील प्रत्येकी 4 पैकी एक भारतीय अधिक प्रीमियमसह टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतो. अहवालानुसार, इतर अडचणींमध्ये लपविलेल्या अटी, दाव्यांच्या संबंधित रिटर्न, टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याच्या वेळेस प्रीमियम आणि कव्हरचे मूल्य समाविष्ट होतात.
एका अहवालानुसार, 71 टक्के लोक मुदत विमा खरेदी करताना प्रीमियम हा सर्वात महत्त्वाचा निकष मानतात. यामध्ये कव्हरचे मूल्य किती असेल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या काळात आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन टर्म इन्शुरन्स घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy