SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. धार्मिक कार्यात मन लागेल. उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर अडचनी दूर होतील. वाद विवादांना महत्व देऊ नका. लहानमोठ्या प्रवासाचे योग संभावतील. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगा. व्यापार, व्यवसायात अनुकूल लाभ मिळेल.

वृषभ (Taurus): पैशांची उधळपट्टी टाळावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे. अनपेक्षित मोठा खर्च होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. मौल्यवान वस्तू संभाळून ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. निद्रानाश झाल्यामुळे तब्बेत बिघडेल. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या.

मिथुन (Gemini) : कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते. करिअरमध्ये यशप्राप्तीमुळे प्रसन्न रहाल. छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव कायम राहील. आजारी पडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणात सकारात्मक परिणाम जाणवेल. आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहाल.

कर्क (Cancer) : कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात. देवदर्शनाचा लाभ मिळेल. अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला.

Advertisementसिंह (Leo) : अति विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत. घराच्या कामात व्यस्त राहाल. मीडिया आणि आयटीचे लोकांना दिवस चांगला राहील. आज संध्याकाळी तुम्हांला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहिल.असंतोषाची भावना मनात वाढेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. आईला गृहसजावटीत बदल कराल.

कन्या (Virgo) : शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये. राजकारणातील व्यक्तींना एखाद्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अन्न दान करावे. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही.

तुळ (Libra) : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. तुमच्याकडे कामाचा भार होईल. सगळ्या कामांवर बारीक लक्ष असेल. पैशांच्या बाबतीत सावधानता बाळगा. कुटुंबातील वातावरण संमिश्र राहील. कामाचा तणाव वाढू शकतो. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे.

वृश्‍चिक (Scorpio) : रेस जुगारातून लाभ संभवतो. नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल. वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीसोबत वाद निर्माण होऊ शकतात. प्रवासात सावध रहा. धावपळ चालू राहिल. आरोग्य खराब होऊ शकते. व्यापार, व्यवसायाच प्रगती होईल. मनोरंजन, आरामाची संधी मिळेल.

Advertisementधनु (Sagittarius) : क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. एखाद्या विशेष व्यक्तीबरोबर शाब्दीक वाद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. चिंता कायम राहील. व्यवसाय चांगला सुरू राहील. उच्चाधिकार्यांकडून व्यवसायात आर्थिक लाभ होईल.


मकर (Capricorn) : कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वातावरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. कार्य सिद्धीस गेल्याने तुम्हाला आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहिल. आरोग्य उत्तम राहील. हनुमान स्त्रोत्राचं नक्की पठण करा. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपारनंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन राहील.

कुंभ (Aquarious) : बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा. थकीत रक्कम परत मिळवण्यात यश मिळेल. प्रवासाचा योग निश्चित आहे. नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. प्रेम संबंधात अनुकूलता राहिल. वाद टाळा. व्यवसाय चांगला चालेल. कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही.

मीन (Pisces) : जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका. रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होतील. वेळ अनुकूल राहील. प्रयत्न करणं सोडू नका. यश मिळेल. स्थायी संपत्तीचे व्यवहार लाभदायी ठरतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल.

Advertisement