नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘रयत शिक्षण संस्थे’त विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे. या नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर तरुणांनाही या नोकर भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
रयत शिक्षण संस्थेत (Recruitment in Rayat Shikshan sanstha, satara) होणाऱ्या या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
एकूण जागा – 79
पुढील जागांसाठी भरती
- प्राचार्य
- समन्वयक
- शिक्षक (के.जी.)
- प्राथमिक शिक्षक (पीआरटी)
- उच्च प्राथमिक शिक्षक (पीआरटी)
- माध्यमिक शिक्षक (टीजीटी)
- क्रीडा शिक्षक
- कला आणि संगीत शिक्षक
- संगणक शिक्षक
- ग्रंथपाल
- समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – B.A./ M.A./B.Sc/ M.Sc (शैक्षणिक पात्रतेबाबतची विस्ताराने माहिती वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
मुलाखतीचा पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, ता. जि. सातारा- 415001.
मुलाखतीची तारीख : 19 मे 2022.
सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – rayatshikshan.edu
जाहीरात पाहण्यासाठी क्लिक करा : http://rayatshikshan.edu/WebFiles/Rayat%20Final%20AD.pdf