SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ पिकाबाबत कृषी मूल्य आयोगाची केंद्राला महत्वाची शिफारस..!

महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालाय.. कारखान्यांचे हंगाम संपत आले, तरी शेतात ऊस तसाच उभा असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालंय.. या शिल्लक उसाचे करायचं काय, असा प्रश्न ऊसउत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे..

बीडमधील एका शेतकऱ्यानं तर थेट उसाला काडी लावून स्वत:ही आत्महत्या केली.. ऊसउत्पादक शेतकऱ्यांवर यापूर्वी कधीच अशी वेळ आली नव्हती.. काही दिवसांपूर्वी तर उसाची मोठ्या प्रमाणात पळवा पळवी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कारखानदार शेतकऱ्यांची हांजी हांजी करीत होते..

Advertisement

कृषी मूल्य आयोगाची शिफारस
दरम्यान, ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा, यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने (Agricultural Value Commission) मोठ्या हालचाली सुरु केल्याची माहिती मिळाली.

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला एक शिफारस केली आहे. या शिफारशीनुसार, यापुढच्या काळात शेतकऱ्यांना कुठल्याही साखर कारखान्याला ऊस देण्याचं स्वातंत्र्य असेल. तसेच, आता यापुढे दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाकलं जाणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघणार असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

साखर कारखान्यांचा कारभार समाधानकारक नसेल, तर संबंधित कारखान्यांना ऊस देण्याचं कोणतंही बंधन आता शेतकऱ्यांवर नसणार आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला हे बंधन उठविण्याची शिफारस केली आहे. आपल्या शिफारशीमध्ये आयोगाने दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाकण्याची सूचना केली आहे..

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या या शिफारशीमुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळेल. शिवाय कारखान्यांची मक्तेदारी राहणार नाही व शेतकऱ्याला आपला माल कुठेही विकता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement