SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अटक पण…

मुंबई :

भाजप  नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात आज अटक करण्यात आली. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी काल शुक्रवारी (ता. 13) त्यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र अटक केल्यानंतर दरेकर यांना तात्काळ जामीन देखील मिळाला आहे.

Advertisement

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढविल्यामुळे प्रविण दरेकर अडचणीत आले आहेत.  मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी 35 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांच्या हमीवर दरेकर यांना जामीन मंजूर केला आहे.

Advertisement

काय आहे घोळ :- दरेकर यांनी मजूर म्हणून निवडणुकीत लढवली. मात्र विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. मग एवढी संपत्ती असलेला व्यक्ती मजूर कसा? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Advertisement