SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अखेर ती वेळ आलीच! ‘त्या’ शेतकऱ्यांकडून सरकार हप्त्याची रक्कम घेणार परत..

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पात्रता तपासून लाभार्थ्यांच्या यादीत बदल करण्यात येणार असून सरकारने एक पथक नेमलं असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. ग्रामपंचायतद्वारे काम चालू आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशा शेतकऱ्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येणार असून पात्र नसून काही शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांना आता सरकारला पैसे परत करावे लागणार आहेत.

लाभ घेणारे अपात्र शेतकरी पैसे कसे परत करणार..?

Advertisement

देशातील लाखांहून अधिक अपात्र शेतकरी सापडले आहेत, जे पीएम किसानचा हप्ता घेत होते. आता या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. यूपीमध्ये आतापर्यंत झालेल्या तपासणीत 3 लाख 15 हजार लाभार्थी अपात्र आढळले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

अधिक माहीती अशी की, देशात ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर कोणी पीएम किसान योजनेचा बनावट शेतकरी बनून लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या PM Kisan च्या पोर्टलद्वारे रक्कम परत करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने वसुली करण्यासाठी ऑनलाईन रिफंड नावाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

Advertisement

बनावट शेतकरी बनून यापूर्वी ज्या लोकांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांनी http://pmkisan.nic.in/ या पोर्टलवर जाऊन खालील ‘Farmers Corner’ वर जाऊन ‘Online Refund’ वर क्लिक केले की पैसे सरकारला परत करता येणार आहेत.

यामध्ये ज्यांनी तालुका/जिल्हा/ राज्य सरकारमार्फत जर पैसे परत केले आहेत आणि अद्याप पैसे परत केले नाहीत त्यांच्यासाठी पर्याय आहेत. ज्यांनी पैसे परत केले नाहीत, त्यांना समोर क्लिक करावे लागेल. मग यानंतर असे लोक आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक, फोटो आणि वसुलीची रक्कम भरून पैसे परत करण्याची प्रक्रिया करू शकतात.

Advertisement

अन्यथा अशा नागरिकांवर कारवाई

योजनेचा 10वा हप्ता जारी झाल्यानंतर, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे, जे आयकर भरण्यासोबतच सरकारी सेवेत आहेत. अशा लोकांवर आणि बनावट शेतकऱ्यांवर सरकार अद्याप रक्कम परत न केलेल्या कारणावरून वसुली व पुढील कारवाई करू शकते. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement