SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जुन्या कारमध्ये ‘सीएनजी कीट’ बसवताय..? ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका..!

पेट्रोल-डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे आता वाहन वापरणंही मुश्किल झालंय.. त्यामुळे ग्राहकांचा कल पर्यायी वाहनांकडे वळल्याचे दिसतं.. एक तर इलेक्ट्रिक किंवा ‘सीएनजी’ वाहन खरेदी करताना अनेक जण दिसतात..

पेट्रोल-डिझेलपेक्षा ‘सीएनजी’ स्वस्तात पडतो. शिवाय, त्यामुळे पर्यावरणाचीही हानी कमी होते. आता ठिकठिकाणी ‘सीएनजी’ पंप तयार झाल्याने प्रवासात कुठेही अडचण येत नाही.. त्यामुळेच ग्राहकांकडून नवीन वा सेकंड हँण्ड ‘सीएनजी’ कारच्या मागणीत मोठा वाढ झालीय..

Advertisement

बरेच जण नवी ‘सीएनजी’ कार खरेदी करतात. बजेट कमी असल्यास काही लोक ‘सेकंड हँड’ कार खरेदी करतात नि नंतर त्यात ‘सीएनजी’ कीट बसवले जाते, परंतू कारसाठी ते हानीकारक ठरु शकतं.. सेकंड हँड ‘सीएनजी’ कार खरेदी करताना काय पाहायला हवं, याबाबत जाणून घेऊ या.

काय काळजी घ्याल..?

Advertisement

फॅक्टरी फिट सीएनजी कार घ्या – ‘सेकंड हँड’ सीएनजी कार घेताना, फॅक्टरी फिट ‘सीएनजी’ कार खरेदी करणं कधीही चांगलं.. कारण कंपन्या त्यांच्या ‘सीएनजी’ कारच्या सुरक्षेवर विशेष भर देत असतात..

सतत ‘सीएनजी किट’ तपासा- ‘सेकंड हँड’ सीएनजी कार खरेदी केली असल्यास, वेळोवेळी मार्केट ‘सीएनजी किट’ तपासत राहा. गाडीतून गॅस गळती तर होत नाही, याबाबत काळजी घ्या..

Advertisement

सर्वाधिक अपघात – गेल्या काही दिवसांत ‘सीएनजी किट’चा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बहुतेक स्फोट गॅस भरताना होतात. त्यामुळे बऱ्याचदा सिलिंडर भरताना पंपचालक नागरिकांना गाडीतून खाली उतरायला सांगतात.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा – गॅस भरण्यासाठी ‘सीएनजी’ स्टेशनवर गेल्यावर गाडीतून उतरून काही अंतर चालत जा. गॅस रिफ्यूलिंग दरम्यान कारमध्ये अजिबात बसू नका. वेळोवेळी सीएनजी सिलेंडरमध्ये गळती होते का, ते तपासा. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये कमी किमतीचे, निकृष्ट दर्जाचे ‘सीएनजी किट’ बसवू नका.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement