SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधी केली निवृत्तीची घोषणा, मग केलं ट्विट डिलिट, चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचं चाललंय काय..?

‘आयपीएल’च्या यंदाच्या पर्वात ((IPL)-2022) गतविजेत्या ‘चेन्नई सुपर किंग्ज’ संघाची कामगिरी मनासारखी झालेली नाही.. ‘कॅप्टन कुल’ एम. एस. धोनी ऐवजी यंदा अष्टपैलू रवींद्र जाडेजाकडे नेतृत्व देण्यात आले.. मात्र, संघाला अपयश आल्याने पुन्हा धोनीकडे नेतृत्व आले.. मात्र, त्यानंतर संघाची कामगिरी सुधारली नाही..

‘सीएसके’ अडचणीत असतानाच, एका बातमी आज खळबळ उडाली. चेन्नईचा खेळाडू अंबाती रायडू याने आज तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. ट्विट करुन याबाबतची माहिती त्याने दिली.. मात्र, नंतर काही क्षणातच त्यानं ते ट्विट ‘डिलीट’ केलं.. त्यामुळं रायडूने खरंच निवृत्ती घेतली की नंतर त्याचे मतपरिवर्तन झालं, अशी चर्चा रंगलीय.

Advertisement

नेमकं काय घडलं..?

अंबाती रायडूने शनिवारी (ता. 14) दुपारी 12.46 वाजता एक ट्विट केलं.. त्यात त्यानं असं म्हटलं की, “मी जाहीर करीत आहे, की ही माझी अखेरची ‘आयपीएल’ असेल. गेली 13 वर्षे मी ‘आयपीएल’मध्ये खेळत आहेत. दोन महान संघासोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. या अप्रतिम प्रवासासाठी ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सीएसके’चे मनापासून आभार मानायला आवडेल..”

Advertisement

अशा शब्दांत अंबाती रायडू याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.. रायडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केल्याने ‘सीएसके’सह क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.. मात्र, हे आश्चर्य काही वेळच राहिलं.. त्यानंतर लगेच रायडूने निवृत्ती जाहीर करणारं ट्विट डिलिट केलं.. त्यामुळे रायडूने निवृत्ती घेतली वा नाही, याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

Advertisement

दरम्यान, 2019 च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत रायडूला टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं त्याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो फक्त ‘आयपीएल’च खेळत हाेता. चेन्नई संघासाठी त्याने अनेकदा ‘मॅच विनिंग’ खेळ केला आहे.

गेल्या काही दिवसांत चेन्नईच्या ताफ्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अशा वेळी रायडूने ट्विटद्वारे निवृत्तीची घोषणा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. विशेष म्हणजे, त्यानंतर काही वेळात त्याने ते ट्विट डिलीट केल्यामुळे आता तर आणखी चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement