SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात. भावंडांशी काही तरी कुरबुर होईल.

वृषभ (Taurus): मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. भावंडांचा विरोध होऊ शकतो. नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

मिथुन (Gemini) : दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका. प्रकृती जपा. दिवस मध्यम आहे. टेंशन घेऊन उपाय मिळणार नाही.

कर्क (Cancer) : स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील. तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. गाडीवर बाहेरगावी जाताना डोक्यामध्ये हेल्मेट घाला.

Advertisementसिंह (Leo) : तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. मिथुन राशीच्या लोकांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होणार आहे. महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आजच पूर्ण करा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. अतिविचार करत बसू नका. स्वस्तातील वस्तू खरेदी कराल.

कन्या (Virgo) : चांगले आर्थिक नियोजन करू शकाल. आज तुम्ही प्रवासाचा आनंदही घेऊ शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्चात घट होऊ शकते. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.

तुळ (Libra) : आज वादविवादांपासून दूर राहणे योग्य राहील. कामाच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. आर्थिक लाभ मिळेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता-पायास किरकोळ इजा होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : घरातील सदस्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या कुटुंबाला गौरव मिळेल. नवीन कामात भरपूर यश मिळेल. सासरच्यांशी चर्चा होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल.

Advertisementधनु (Sagittarius) : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. पैशांची उधळपट्टी टाळावी. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत, थोडासा त्रास होईल, पण यशस्वी व्हाल.

मकर (Capricorn) : काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. मनातील इच्छा पूर्ण होतील.

कुंभ (Aquarious) : भगवंताचे ध्यान केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पाहाल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. उन्हाचे चटके सोसत बसू नका.

मीन (Pisces) : आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये. आज जरासा डोक्याला ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. जेवण करताना पाणी घेऊन बसा.

Advertisement