SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अरबाजनंतर सोहेल खानही घेणार बायकोपासून घटस्फोट, 24 वर्षांचा संसार मोडणार..!

‘शादी का लड्डू.. जो खाये पछताये, जो ना खाये वो पछताये..’ असं म्हटलं जातं.. गेल्या काही दिवसांत बाॅलिवूडमधील अनेकांचे दोनाचे चार हात झाले. त्याच वेळी काहींनी आपल्या जीवनसाथीपासून फारकतही घेतल्याचे पाहायला मिळाले.. त्यात आता बाॅलिवूडमधील आणखी एका जोडप्याचा समावेश झाला आहे..

2017 मध्ये अरबाज खान व मलायका यांचा घटस्फोट झाला. मात्र, हा विषय आजही माध्यमांतून झळकत असतो. त्यानंतर आता सलमान खानचा दुसरा भाऊ सोहेल खान व सीमा यांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आलंय..

Advertisement

सोहल खान व त्याची पत्नी सीमा यांचे ‘फॅमिली कोर्टा’बाहेरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या दोघांनी घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज केल्याचं कळतंय. परस्पर सहमतीने हा घटस्फोट होत आहे. अर्थात, अद्याप सोहेल वा सीमा यांनी घटस्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

लग्नाची फिल्मी कहाणी
अभिनेता चंकी पांडे याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोहेल व सीमा यांची भेट झाली होती. पहिल्याच नजरेत दोघंही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. मात्र, दोघांचेही धर्म वेगवेगळे असल्यानं या प्रेमात अनेक अडचणी आल्या. सीमाच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं.. मात्र, दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता 1998 मध्ये ‘लव्ह मॅरेज’ केलं होतं.

Advertisement

अगदी अर्ध्या रात्री मौलवींना ‘किडनॅप’ करून या दोघांना ‘निकाह’ झाला होता. नंतर दोघांनी आर्य मंदिरात पुन्हा एकदा लग्न केलं. त्यांना निर्वाण आणि योहन अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या लग्नाला नुकतीच 24 वर्षे पूर्ण झाली. 2017 पासून ते वेगवेगळे राहतात, पण आता दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

सीमा ही फॅशन डिझाईनर आहे. ‘बांद्रा 190’ नावानं तिचं एक ‘फॅशन स्टोअर’ही आहे. सोहेल खान हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता आहे. त्यानं अनेक चित्रपटांतही काम केलंय. 2002 साली ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर प्यार किया तो डरना क्या, वीर, जय हो, हॅलो, राधे, ट्यूबलाईट अशा चित्रपटांत तो दिसला होता.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement