गूगलने आपल्या भाषांतर करण्यासंदर्भात ट्रान्सलेशन टूल मध्ये काही भाषांची यादी अपडेट केली आहे. आता तुम्ही गुगलवर संस्कृतसह इतर नवीन भारतीय भाषांमध्ये भाषांतर करू शकणार आहात. कारण गूगल ट्रान्सलेट (Google Translate) मध्ये आता 24 नव्या भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 8 भारतीय भाषांचा देखील समावेश झाला आहे.
नवीन अपडेटनंतर Google ने Google Translate मध्ये संस्कृतसह 8 भारतीय भाषा जोडल्या आहेत. यामुळे भारतीय प्रादेशिक भाषांची संख्या वाढणार आहे. बुधवारी सुरू झालेल्या वार्षिक गुगल परिषदेत ही घोषणा करण्यात आली. आपले ऑनलाईन भाषांतर प्लॅटफॉर्म गूगल ट्रान्सलेटवर गूगल वेळोवेळी बऱ्याच प्रादेशिक भाषा जोडत आहे.
गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध असलेल्या एकूण भारतीय भाषांची संख्या आता 19 वर गेली आहे. त्यामुळे आता जगभरातील एकूण 133 भाषांना गूगल ट्रान्सलेटमध्ये भाषांतरित करता येणार आहे आणि असंख्य लोकांना आता भरपूर फायदा मिळणार आहे.
कोणत्या नवीन भारतीय भाषांचा झाला समावेश..?
▪️ संस्कृत
▪️ कोकणी
▪️ भोजपुरी
▪️ आसामी
▪️ डोगरी
▪️ मैथिली
▪️ मणिपुरी
▪️ मिझो
गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर आयझॅक कॅसवेल यांनी सांगितले की, ‘संस्कृत’ ही गुगल ट्रान्सलेटमध्ये भाषांतरित करण्यासाठी प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे. हE पाहून आता आम्ही ती भाषा जोडत आहोत. आम्ही प्रथमच ईशान्य भारतातील भाषांनाही जोडत आहोत, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy