SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चालू सामन्यात बत्ती गूल, पुढं काय घडलं..?

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील काल (ता.12 मे) 59व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील सामना सुरु असताना वीज नसल्यामुळे वानखेडेची बत्ती गुल (Wankhede Stadium Power Issue) झाली आणि नाणेफेक करण्यासाठी उशीर झाला. या मोठ्या समस्येमुळे चर्चा सर्वत्र पसरली कारण या सामन्यातील पहिली चार षटके दोन्ही संघांना DRS घेण्यासाठी शक्य झाले नाही.

एक अधिकारी म्हणाले, ‘सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक करण्याच्या काही वेळ आधी शॉर्ट सर्किट झाल्याने सामन्याच्या पूर्ण नियोजनाबाबत गोंधळ उडाला. व्यवस्थेत बिघाड झाल्याने नाणेफेकीला उशीर झाला. फ्लडलाईटला आवश्यक वीजपुरवठा होत नव्हता, त्यामुळे ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनलाही समस्या आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सुरळीत केली”, असं त्यांनी सांगितले.

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, डिझेल जनरेटरमध्ये काही बिघाड झाला होता. इथूनच ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनला वीज पुरवठा होतो. त्यानंतर एमसीएने ब्रॉडकास्टला बॅकअप पॉवर सप्लाय दिला. मात्र हा सप्लाय एक्टिव्ह होण्यासाठी बराच वेळ गेला.

सामना सुरु असताना ‘हे’ काय घडलं..?

Advertisement

मुंबई आणि चेन्नई यांच्यात सामना सुरु असताना पहिल्याच षटकादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर चेन्नईकडून सलामीला आलेला ड्वेन कॉन्वेला (Devon Conway) शुन्यावर पायचीत झाला. ड्वेन कॉन्वेला चुकीच्या पद्धतीने पायचित म्हणून बाद देण्यात आले, हे काही वेळाने समजलं. चेंडू स्टंपच्या बाजूने गेलेला असूनदेखील त्याला पंचांनी बाद दिले. त्यावर उपाय म्हणून ड्वेन कॉन्वेने डीआरएस घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र मैदानात वीज उपलब्ध नसल्यामुळे त्याला डीआरएस घेता आला नाही.

पुढील षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) दुसऱ्या षटकात रिव्ह्यू मागितला खरा पण डीआरएस (DRS) मात्र त्याला मिळाला नाही आणि मग अंपायरचा निर्णयच अंतिम ठरवला गेला. यानंतर मात्र चेन्नईच्या धोनीने काही फटकेबाजी केली आणि तो वगळता एकामागून एक फलंदाज स्वस्तात बाद झाले. याचा परिणाम सीएसके टीम स्पर्धेतून बाहेर गेली. सगळं काही झालं आणि काही वेळाने सुरळीत देखील झालं पण चर्चा सर्वत्र झाली. सोशल मीडियावर मात्र अनेक फॅन्स, मिमर्स नी मुकेश अंबानींचे (Mukesh Ambani Memes) वानखेडेची वायर कट करतानाचे मीम्स बनवून व्हायरल करायला लगेच सुरुवात केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement