यंदा फारच कडक उन्हाळा सुरु आहे.. काही ठिकाणी तर पारा 45 अंशावर गेला.. उष्माघाताने काहींचा बळी गेला.. गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढग दाटून आल्याने उन्हाच्या काहिली काहीसी कमी झाली असली, तरी पुन्हा एकदा उन्हाच्या झळा जाणवणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत..
दुपारच्या वेळी कडक उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो.. पण महत्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते.. त्यातही पायी किंवा बाईकवर फिरणाऱ्यांची अवस्था तर विचारुच नका.. हेल्मेट असले, तरी डाेक्यातून घामाच्या धारा लागलेल्या असतात.. बरं हेल्मेट नाही घालावं, तर उन्हाचा चटका बसणार, शिवाय सुरक्षेचाही प्रश्न असतोच की..
हेल्मेटमुळं उकाड्याने जीव हैराण होत असला, तरी आता काळजी करु नका.. कारण, आता बाजारात असं गॅझेट आलंय, की त्यामुळं हेल्मेटचं (Helmet) तापमान अगदी 15 अंशांपर्यंत कमी करता येतं.. त्यामुळे भर उन्हात तुम्ही बाईकवरुन प्रवास करु शकता. या अनोख्या गॅझेटबद्दल जाणून घेऊ या..
अनोख्या हेल्मेटबाबत..
‘ब्लू आर्मर’ (BluArmor) नावाची एक कंपनी आहे, जी हेल्मेटसाठी कूलर बनवण्याचं काम करते. सध्या या कंपनीनं बाजारात आपली तीन गॅझेट्स आणलीत. BluSnap2, BLU3 A10, आणि BLU3 E20 अशी त्यांची नावं.. ही गॅझेट्स पूर्ण डोकं झाकणाऱ्या ‘हेल्मेट’ला लावता येतात. त्याद्वारे गारेगार, धूळविरहीत नि स्वच्छ हवा मिळते. अगदी 15 अंशापर्यंत हेल्मेटमधील तापमान कमी करता येतं असल्याचा कंपनीचा दावा आहे..
- ‘BluSnap2 हे या गॅझेटमधील ‘बेसिक मॉडेल’ असून, त्याची किंमत फक्त 1299 रुपये आहे. त्याचं वजन 250 ग्रॅम आहे. ग्राहकांना त्यात आणखी एक ‘एक्स एअरफ्लो’ मिळणार आहे.
- ‘BLU3 A10’ या दुसऱ्या मॉडेलची किंमत 2,299 रुपये आहे. त्यात 2 ‘एक्स एअरफ्लो’ असून, त्याचं वजन 260 ग्रॅम आहे. या मॉडेलमध्येही 15 अंशांपर्यंत तापमान कमी करण्याची क्षमता आहे. शिवाय पंख्याची गतीही कमी जास्त करण्यासाठी तीन कंट्रोल दिलेले आहेत. मात्र, त्यात कोणतंही कनेक्टिव्हीटी फीचर दिलेलं नाही.
- ‘BLU3 E20’ या मॉडेलमध्ये ‘कनेक्टिव्हीटी’ फीचर मिळते. शिवाय आधीच्या मॉडेलमधील दोन ‘एक्स एअरफ्लो’ आणि पंख्याची गती कमी जास्त करणारे तीन कंट्रोलही मिळतात. कनेक्टिव्हीटी फिचरमुळे म्युझिक, कॉल नॅव्हिगेशन नि व्हॉट्स अॅपही यात वापरू शकता.
कसं वापरायचं..?
हेल्मेटला ‘कूल’ बनवणारं हे ‘गॅझेट’ वापरण्यासाठी ‘अॅप’चा वापर करावा लागतो. शिवाय ‘व्हॉईस असिस्ट्ंन्स’द्वारेही हे गॅझेट वापरता येते.. कंपनीच्या वेबसाईटवर तीन पैकी कोणतंही गॅझेट तुम्ही खरेदी करु शकता.. सध्या ‘समर सेल’ (Summer Sale) कोड वापरून किंमतीत सूटही मिळवता येईल.