मुंबई :
प्रत्येक ई-कॉमर्स कंपनी आपल्या प्रोडक्टसवर भरघोस सूट देत असते. जेव्हा जेव्हा स्पर्धा वाढते, तेव्हा तेव्हा जास्त ऑफर्स दिल्या जातात. आता लग्नसराई आणि इतर सण-उत्सवांच्या निमित्ताने या कंपन्या दमदार सूट देत आहेत. अशीच सूट Vivo SmartPhone वर फ्लिपकार्टने दिली आहे. Flipkart ने एका सेलमध्ये तगडी ऑफर दिली आहे.
Flipkart Turbo Carnival Sale सेलमध्ये विवोच्या नव्या टी सीरिजचे स्मार्टफोन एकदम कमी किमतीत विकले जात आहेत. या सेलमध्ये Vivo T1 5G अत्यंत स्वस्तात मिळेल. थेट डिस्काउंट तर आहेच परंतु एक्सचेंज ऑफरनंतर हा फोन 1500 रुपयांच्या आत मिळेल. मात्र एक लक्षात घ्या की, हा सेल 12 मे ला सुरु झाला असून 16 मे ला संपणार आहे.
अशी आहे ऑफर :-
Vivo T1 5G च्या बेस व्हेरिएंट भारतात 19,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टवर याची विक्री 15,990 रुपयांमध्ये केली जात आहे. HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच Vivo T1 5G वर 13,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील सिली जात आहे. तुम्ही चांगल्या स्थितीत असलेला जुना मोबाईल देऊन 13,000 रुपये वाचवू शकता म्हणजे नवीन Vivo T1 5G फक्त 1,490 रुपयांमध्ये तुमचा होईल.