SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता उन्हातही बाईक चालवा बिनधास्त; मार्केटमध्ये आलाय कमी किमतीचा हेल्मेट कुलर

सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. भर दुपारी किंवा उन्हाच्या झळा बसत असतील, तर अशा काळात घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर न पडण्याचे आवाहन सरकार व आरोग्य क्षेत्रातील तज्ञ करत असतात. मात्र कितीही केलं तरी ज्याचं फिरणं, हेच काम आहे, त्यांना मात्र उन्हात प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. जसे की, डिलिव्हरी बॉय, मार्केटिंगवाली नवीन मुले आणि असे अनेक लोक… या उन्हातही उन्हामुळे होणारे हाल वेगळे आणि त्यात हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याने त्याचे हाल वेगळे.. विशेषतः कडक उन्हात अनेकदा हेल्मेट घातल्याने एक वेगळाच त्रास जाणवतो.

 

Advertisement

मात्र इथून पुढे तुमचा उन्हातून बाईकवरचा प्रवासही खूप सुखकर होणार आहे. आज आम्ही तुम्हाला एका हेल्मेट कुलरविषयी सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमचा प्रवास भर उन्हातही थंडगार होईल.

BluArmor नावाची ही एक कंपनी असून ती एक वेगळे प्रोडक्ट बनवते. जे सर्वसामान्य मार्केटमध्ये आढळून येत नाही. ही कंपनी हेल्मेटसाठी कुलर बनवते. सध्या तीन प्रकारचे कुलर आपल्याला या कंपनीकडून मिळू शकतात. BluSnap2, BLU3 A10 आणि BLU3 E20 असे 3 प्रकारचे हे डिव्हाइस आपण खरेदी करू शकता. हे डिव्हाइस आपण कोणत्याही फुल फेस हेल्मेटसह वापरू शकतो. ज्याच्या मदतीने आपल्याला थंड, धूळमुक्त आणि फिल्टर केलेली हवा मिळते.

Advertisement

ब्रँडचा दावा आहे की तिन्ही, डिव्हाइस हेल्मेटचे तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करू शकतात. BluSnap2 च्या बेसिक मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 1299 रुपये आहे. यामध्ये जास्तीत जास्त 1X एअरफ्लो मिळेल. त्याचे वजन 250 ग्रॅम आहे.

Advertisement