SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुंबई इंडियन्सला रडवणारा दमदार खेळाडू स्पर्धेच्या बाहेर; कोलकाता नाइट रायडर्सला झटका

मुंबई :

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा अतिम टप्प्याकडे चालली असताना गेल्या काही दिवसात जवळपास तगडे 3 खेळाडू स्पर्धेच्या बाहेर झाले आहेत. एकापाठोपाठ एक खेळाडू सामन्यात खेळताना किंवा सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. आधी रवींद्र जाडेजा, पृथ्वी शॉ आणि आता मुंबई इंडियन्सला नको नको करून सोडणारा पॅट कमिन्सही दुखापतीमुळे हैराण झाला आहे.

Advertisement

आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पॅट कमिन्सही (pat cummins) दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याला नितंबाची दुखापत (Hip Injury) झाली असून याच कारणामुळे तो आयपीएल 2022 हंगामाच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर (Ruled out of IPL 2022) झाला आहे. तो आयपीएल 2022 स्पर्धा (IPL 2022) खेळायला आला, तेव्हापासूनच दुखापतीने त्रस्त होता. मात्र, त्याची दुखापत तेव्हा फार गंभीर नव्हती. तरी, त्याला या हंगामात दुखापतीमुळे 5 सामनेच खेळता आले.

 

Advertisement

पॅट कमिन्सची दुखापत कोलकाता नाइट रायडर्ससाठी (KKR) मोठा झटका आहे. कमिन्स कोलकाता संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. कमिन्सला हिप इंजरी झाली आहे. त्यामुळे तो मायदेशात ऑस्ट्रेलियाला निघून गेला आहे. कमिन्सने अलीकडेच मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन मुंबई इंडियन्सचा कबंरड मोडलं होतं.

Advertisement