SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : Elon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला स्थगिती

मुंबई :

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे प्रमुख Elon Musk आता मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे देखील मालक झाले आहेत. ट्विटरची संपूर्ण मालकी आता मस्क यांच्याकडे आहे. त्यांनी तब्बल 44 बिलियन डॉलर्सला (जवळपास 3368 अब्ज रुपये) ट्विटरला खरेदी केले आहे. मस्क हे मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला खरेदी केल्यापासून सातत्याने चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरला खरेदी केल्यापासून सातत्याने यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

मस्क यांनी ट्वीटरसोबत 44 अब्ज डॉलरची डील केली होती, पण आज मस्क यांनी मोठी घोषणा केली आणि 44 अब्ज डॉलर्सची डील थांबवली असल्याचे सांगितले आहे. याबद्दल त्यांनी स्वत ट्वीट करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, ट्विटर करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरने एका फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5% स्पॅम/बनावट खाती आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22.9 कोटी वापरकर्ते आहेत.

 

Advertisement

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी ट्वीटर करारापूर्वीच सपष्ट केले होते. ट्विटर प्लॅटफॉर्मवरून ‘स्पॅम बॉट्स’ काढून टाकणे हे त्यांचे प्राधान्य असेल. आता एलोन नेमके भविष्यात या डील बाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असेल.

Advertisement