SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 95 रुपये भरून 14 लाखांपर्यंत फायदा? अशी आहे पोस्टाची योजना..

पोस्ट ऑफिसमध्ये अनेक जीवन विमा योजना आहेत ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त परतावा बनवतात. ग्राम सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजना (Gram Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) ही एक अशी विमा योजना आहे, जी अल्प गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेमध्ये एका व्यक्तीला दर दिवसाला केवळ 95 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला की योजनेच्या शेवटी तुम्हाला 14 लाख रुपये मिळतील. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे विमाधारकाला चांगला लाभ मिळतो.

Advertisement

पॉलिसी (Policy) घेतल्यानंतर विमाधारकाला पॉलिसीच्या कालावधीत ग्राम सुमंगल योजना मनी बॅक पॉलिसीचा (Gram Sumangal Yojana) विमाधारक जिवंत असतानाच लाभ आणि बोनसदेखील देते. मनी बॅक इन्शुरन्स पॉलिसी ग्राम सुमंगल योजनेत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचे सम एश्योर्ड मिळते.

▪️ पॉलिसी सुमंगल योजना 2 कालावधीसाठी उपलब्ध आहे. हा विमा 15 किंवा 20 वर्षांसाठी घेतला जाऊ शकतो.

Advertisement

▪️ पॉलिसीधारकाचे वय 19 ते 45 वर्षे दरम्यान असणं गरजेचं आहे.

▪️ एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि 20 वर्षांसाठी ही पॉलिसी खरेदी केली, तर त्याला रोज 95 रुपये हप्ता बसू शकतो.

Advertisement

▪️ प्रत्येक महिन्याला 2850 रुपये भरून 3 महिन्यांसाठीचे हप्ते भरले की, तुम्हाला 8550 रुपये व 6 महिन्यांसाठी तुम्हाला 17,100 रुपये भरावे लागतील.

▪️ मग, तुम्हाला मॅच्युरिटीवर अर्थात 20 वर्षे पूर्ण झाल्यावर अंदाजे 14 लाख रुपये मिळू शकतात.

Advertisement

या पॉलिसीमध्ये, तुम्हाला 10 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. त्याच वेळी, पॉलिसी दरम्यान व्यक्तीला जिवंतपणी 15 वर्षांमध्ये 6 वर्ष, 9 वर्ष व 12 वर्षांमध्ये 20 टक्के पर्यंत पैसे परत दिले जातात. मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित रकमेपैकी 40 टक्के रक्कम देखील तुम्हाला परत दिली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement