SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उद्यापासून बँका सलग ‘इतके’ दिवस राहणार बंद

मुंबई :

परवा रविवार असल्याने बँकांची अधिकृत सुट्टी असते. मात्र काही दिवस सलगपणे बँका बंद असणार आहेत त्यामुळे आपली कामे आजच आटपून घ्या. आज शुक्रवार असल्याने बँका आज चालू असतील. मात्र उद्या शनिवार पासून सोमवारपर्यंत सलग 3 दिवस बँका बंद आहेत. 14 मे ते 16 मे या काळात बँका बंद राहतील. शनिवार, रविवार आणि सोमवारी बुद्धपौर्णिमेला सुट्टी देण्यात आली आहे.

Advertisement

जर आपल्यालाही दैनंदिन व्यवहार करण्याची गरज असेल तर बँकांची कामे आजच आटपून घ्या. अन्यथा आज ती कामे झाली नाहीत तर थेट ही कामं संपण्यासाठी थेट मंगळवारची वाट पाहावी लागेल. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या बँकांच्या सुट्यांच्या यादीत बौद्ध पोर्णिमेचाही सामावेश आहे. यामुळे शनिवार, रविवार, सोमवार बँका बंद राहणार आहेत.

 

Advertisement

RBI ने (Reserve Bank of india) वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट नवीन वर्ष सुरु होताच जाहीर करत असते. या लिस्टनुसार, 2022 च्या मे महिन्यात सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारची सुट्टीही आहे.

Advertisement