SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आवेगाला आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. जुने मित्र भेटतील. आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या. जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्वाची कामे रेंगाळत पडू देऊ नका. सायंकाळच्या आत कामे हातावेगळी कराल तर यश मिळेल. लोकांना आपलेसे करुन काम पूर्ण करुन घ्या.

वृषभ (Taurus): आपली प्रतिष्ठा जपावी. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल. उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. भाग्याचे पाठबळ मिळेल. रोजच्या व्यवहारातील अडचणी व दगदग कमी होईल.

मिथुन (Gemini) : कौटुंबिक शांतता जपावी. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल. चांगली बातमी कानावर येईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. मन प्रसन्न राहील. नोकरीत काही अनपेक्षित घटना घडतील. मुलांच्या प्रगतीची बातमी कळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महत्वाचे कामे सायंकाळी पूर्ण करा. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कर्क (Cancer) : वैचारिक स्थिरता ठेवावी. नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. प्रवास कार्य साधक ठरेल. लोकांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.सिंह (Leo) : प्रेमाच्या दृष्टीने मैत्री घट्ट होईल. चौकसपणा दाखवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. रागावर ताबा ठेवा. यश मिळेल. मात्र संयम सोडू नका. आरोग्याची काळजी घ्या. महत्वाच्या कामात सुरुवातीला अडचणी येतील. मात्र दिवसाच्या अखेरीस लोकांची मदत मिळेल.

कन्या (Virgo) : मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. चटकन निराश होऊ नका. बौद्धिक चलाखी दाखवावी. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते. व्यवहार करताना घाई करू नका. उत्पन्न वाढेल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. थोडा संयम ठेवून वागाल, तर यश मिळेल. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवाक चांगली राहील.

तुळ (Libra) : खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे. रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. मोठी अडचण दूर होईल. वादविवादात पडू नका. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. काही अनपेक्षित घटना घडतील. नोकरीत परिस्थिती बदलेल.

वृश्‍चिक (Scorpio) : मैत्रीचे संबंध जपावेत. स्त्री समूहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल. कामात काहीशी चालढकल कराल. पैज जिंकता येईल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांची मदत मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक बाजू कमकुवत राहील. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. प्रवासाच योग येईल. व्यवसायात भरभराट होईल

Advertisement

.

धनु (Sagittarius) : जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्‍यांची कामे त्रासदायक ठरू शकतात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. ग्रहनमानाची अनुकूलता राहील. मुलांना यश मिळेल.

मकर (Capricorn) : जवळच्या प्रवासात सावधानता बाळगावी. मनातील नसती भीती दूर सारावी. मानसिक चांचल्य जाणवेल. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. उगाचच त्रागा करू नका. विनाकारण खर्च होईल. अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्वाच्या कामात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे पर्दार्थ खाण्यास मिळतील.

कुंभ (Aquarious) : गप्पांमध्ये वेळ घालवाल. मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्रमंडळींशी सलोखा ठेवावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. मुलांना थोडी शिस्त लावा. प्रवासाचा योग येईल. मात्र प्रवासाचे नीट नियोजन करा. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल.

मीन (Pisces) : श्रम व दगदग वाढेल. क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. धोका पत्करू नका. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. संयमाने वागण्याची गरज आहे. महत्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. प्रवासाचा योग. पूर्वतयारी करुन ठेवा. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील.

Advertisement