SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एलआयसीच्या शेअर्सचे आयपीओद्वारे आज वाटप, तुम्हाला मिळणार का? करा चेक..

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ‘आयपीओ’नंतर, आज गुरुवारी, 12 मे रोजी गुंतवणूक दारांना समभागांचे वाटप केले जाणार आहे. चालू महिन्यात 4 मे रोजी एलआयसीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. आता आयपीओसाठी बोली लावल्यानंतर अनेकांना शेअर्स कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे. एलआयसीच्या शेअर्सचे येत्या 17 मेला बाजारातील पदार्पण हे 950 ते 970 रुपयांच्या दरम्यान म्हणजेच जेमतेम वाढीने होण्याचे अंदाज बांधले जात आहेत.

LIC कंपनी 13 मे पर्यंत अपात्र गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात परतावा जमा करेल आणि इक्विटी शेअर्स 16 मे पर्यंत पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. यानंतर शेअर्सची यादी 17 मे ला सादर केली जाऊ शकते. आज एलआयसीच्या शेअर्सचे वाटप होऊ शकते. ज्यांनी आयपीओसाठी अर्ज केला आहे, ते बीएसई वेबसाईटवर किंवा रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर एलआयसीच्या आयपीओ वाटपाबाबतची स्थिती जाणून घेऊ शकतात.

Advertisement

गुंतवणूकदारांना एलआयसीच्या आयपीओ वाटपाची स्थिती पाहण्यासाठी..

बीएसईच्या अधिकृत वेबसाइट bseindia.com किंवा केफिन टेकची वेबसाईट karisma.kfintech.com वर लॉगइन करू शकता.

Advertisement

👉 बीएसई वेबसाईट (BSE Website)

▪️ सर्वप्रथम www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा
▪️ तुम्ही ‘equity’ या पर्यायावर क्लिक करा
▪️ आता ड्रॉपडाऊनमध्ये ‘LIC IPO’ पर्याय निवडा
▪️ आता नवीन पेज ओपन होईल. तेथे तुमचा अर्ज क्रमांक टाका.
▪️ तुमचा पॅन कार्ड क्रमांक नमूद करा
▪️ ‘I am not a robot’ हा पर्याय दिसेल. व्हेरिफाय करा आणि सर्च बटणावर क्लिक करा
▪️ LIC IPO चे शेअर अलॉटमेंट दिसतील.

Advertisement

👉 IPO रजिस्ट्रार वेबसाईट (IPO registrar’s Website)

1) karisma.kfintech.com वर लॉगइन करून आयपीओ LIC निवडा

Advertisement

2) आता ‘ॲप्लिकेशन नंबर’ किंवा DPID/Client ID किंवा पॅन नंबर भरा

3) कॅप्चा भरा आणि शेवटी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement