SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खतासाठी मोदी सरकार देणार 11 हजार रुपये, ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..!

खरिपाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी बि-बियाणे, खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. त्यात यंदा बि-बियाणे, खतांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाल्याने शेतकरी काळजीत पडला आहे.. मात्र, टेन्शन घेऊ नका..!

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकार विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो.. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना, मोदी सरकारची अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे..

Advertisement

‘पीएम किसान खाद योजना’ (PM Kisan Khad Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी 11 हजार रुपयांचे अनुदान देते. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल, त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकेल.

खतांच्या वाढलेल्या किंमती पाहता, ‘पीएम किसान खाद योजना’ शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरु शकते. या योजनेतून खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये सरकारकडून 11 हजार रुपयांचे आर्थिक अनुदान दिलं जातं. त्यातील पहिला हप्ता 6000 रुपये, तर दुसरा हप्ता 5000 रुपयांचा आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यावर अनुदानाचे हे दोन्ही हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले जातात. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास, सरकारकडून खत कंपन्यांना दिले जाणारे अनुदान बंद केले जाणार आहे. शिवाय, योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार असल्याने त्यातील गैरव्यवहार बंद होतील, असा दावा केला जात आहे..

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– रेशनकार्ड
– बँक खाते

Advertisement

– मोबाइल नंबर
– पासपोर्ट फोटो
– शेतीची कागदपत्रे

असा करा अर्ज

Advertisement
  • ‘पीएम किसान खाद योजने’चा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यासाठी सर्वप्रथम ‘डीबीटी’ (DBT)च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटवर ‘पीएम किसान’च्या समोर क्लिक करा.
  • आता तुम्ही पीएम किसान खाद योजनेच्या ऑनलाइन फॉर्मच्या पेजवर जाल. तेथे तुमची भाषा निवडा.
  • नंतर तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी, याची माहिती द्या.
  • तुमचा आधार क्रमांक टाका. नंतर तुमचा जिल्हा निवडून कॅप्चा कोड टाका.
  • शेवटी सर्च बटण दाबून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement