SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऋतुराज गायकवाड असेल CSK चा पुढचा कर्णधार!

मुंबई :

आपीएलमध्ये 4 ट्रॉफी मिळवलेली चेन्नईची टीम यंदा मात्र एकदम ढसाळ परफोर्मंस करत आहे. या हंगामात चेन्नईच्या टीमचे कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे देण्यात आलं होतं. मात्र सलग सलग सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागल्याने त्याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. अशातच मग पुन्हा सुरक्षित खेळी म्हणून रविंद्र जडेजानं कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवलं. मात्र अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सीएसकेचा संघ ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संघाचा कर्णधार बनवू शकतो, असे भाकीत माजी दिग्गज क्रिकेटपटू अजय जडेजाने केले आहे. यंदा धोनी शेवटचं आयपीएल खेळणार अशी चर्चा आहे. रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी दोघंही पुढच्यावर्षी कर्णधारपदी असणार नाहीत अशीही चर्चा आहे. त्यामुळे चेन्नईच्या कर्णधारपदाचा पुढचा दावेदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात असताना अजय जडेजाने हे मोठे विधान केले आहे.

माजी क्रिकेटर अजय जडेजाच्या मते, चेन्नईकडे आता गमावण्यासारखे काही नाही. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) कर्णधार बनवून चाचपणी घेतली पाहिजे. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मत व्यक्त केले.

Advertisement

गायकवाड खूपच तरुण असून त्यांची या संघाची कारकीर्द मोठी आहे. सीएसकेच्या व्यवस्थापनाचाही या खेळाडूवर विश्वास असून त्यांनी लिलावापूर्वी मोठी रक्कम देऊन त्याला रिटेन करण्यात आलं. पुढच्या वर्षी कर्णधारपद त्याच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

Advertisement