SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खर्चाच्या पाचपट उत्पन्न देईल ‘हे’ पीक; जाणून घ्या संपूर्ण विषय थोडक्यात

मुंबई :  

आपले केस खूप जास्त गळत असतील तर आपण कोरफड लावतो. तसेच चेहरा सुंदर व टवटवीत दिसण्यासाठी देखील आपण एलॉ वेरा जेल वापरतो. आपण वेगवेगळे कारणांसाठी एक औषधी वनस्पती म्हणून कोरफडचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? या कोरफड वनस्पतीची लागवड करण्यासाठी खूप कमी खर्च येतो मात्र त्याचे उत्पन्न मात्र अगदी उत्पादनाच्या चारपट, पाचपट होते. जर तुम्हीही शेतकरी असाल आणि शेतीत नव्याने काहीतरी करायची इच्छा असेल तर या कोरफड वनस्पतीची योग्य पद्धतीने लागवड करुन तुम्ही देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून कोरफडीपासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारात मागणी वाढली आहे. याचा सर्वाधिक वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये होतो. तसंच हर्बल उत्पादनं आणि औषधांमध्ये देखील कोरफड मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कोरफड हे कोरडवाहू शेतात खूप चांगल्या प्रकारे येते. कोरफडीच्या लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही. पाणथळ जमिनीवर कोरफडीची लागवड करता येत नाही. हे पीक कमी पाण्यात चांगल्या प्रकारे येते. आणि याच कारणामुळे कोरफडीची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

कोरफडीची लागवड फायदेशीर ठरत असून या पिकातून चांगला नफा मिळतो. त्यामुळे तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कोरफडीची लागवड करू शकता. कोरफडीची बाजारातील मागणी खूप जास्त आहे आणि कंपन्यांना चांगल्या दर्जाचा माल मिळत नाही. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने कंपन्यांच्या स्टँडर्डनुसार कोरफडीचे उत्पादन योग्य पद्धतीने केले तर लाखो रुपयांचे उत्पन्न कमवू शकतो.

Advertisement

कोरफडीची लागवड फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत करता येते परंतु, त्याची लागवड करण्याची योग्य वेळ जुलै-ऑगस्ट आहे. एका एकरात 10,000 रोपं लावता येतात. एका हेक्टरमध्ये कोरफडीची लागवड करण्यासाठी 27,500 रुपये खर्च येतो. तर मजूरी, शेत तयार करणं, खत याचा खर्च गृहित धरून हा खर्च पहिल्या वर्षी 50,000 रूपयांपर्यंत जातो. कोरफडीच्या पानांचा दर प्रतिक्विंटल 2000 रुपये आहे. अशा प्रकारे एका हेक्टरमध्ये एका वर्षात 9,00,000 रुपयांचे उत्पादन होते. कोरफडीचे उत्पादन दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी वाढते आणि ते 600 क्विंटलपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement