SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनी करणार आता सिनेमाची निर्मिती, मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ हिरोईन..!

सिनेमा नि क्रिकेट.. लाखो भारतीयांची धडकन.. सिनेमातील हिरो-हिरोईन क्रिकेटमध्ये दिसतात. तसेच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर अनेक खेळाडूंनीही सिनेमात नशीब आजमावून पाहिलं आहे.. त्यात आता भारताचा सर्वाधिक यशस्वी माजी कॅप्टन एम. एस. धोनी याचाही समावेश होणार आहे..

खरं तर याआधीच धोनीवर एक चित्रपट आला असून, रसिकांनी त्याला चांगली दादही दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने कधीच निवृत्ती स्वीकारलीय.. सध्या तो फक्त ‘आयपीएल’मध्ये ‘सीएसके’कडून खेळताना दिसतो.. मात्र, आता तो ‘आयपीएल’लाही राम राम करण्याची शक्यता आहे..

Advertisement

धोनीची सिनेसृष्टीत एंन्ट्री
क्रिकेटचे मैदान आपल्या बॅटने नि चतूर नेतृत्वाने गाजवणारा लाखो भारतीयांचा लाडका धोनी आता चित्रपटसृष्टीत एंन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय.. तो लवकरच एका तमिळ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे समजते..

Advertisement

क्रिकेटमधील धोनीची कामगिरी नि सुरुवातीपासून ‘चेन्नई सुपर किंग्स’ संघासोबत जुळलेली नाळ.. यामुळे धोनीची तमीळनाडूत मोठी क्रेझ आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेत धोनीने तमीळ प्रोजेक्टची निवड केलीय.. त्याच्या या चित्रपटात मुख्य नायिका म्हणूनही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिची निवड करण्यात आली आहे.. धोनीच्या या चित्रपटाचे शुटिंग या (मे) महिनाअखेर सुरु होणार असल्याचे समजते..

विशेष म्हणजे, दाक्षिणात्य सिनेमात नशीब आजमावणारा धोनी काही पहिलाच क्रिकेटपटू नाही. याआधी हरजभज सिंगनेही ‘डिक्कीलूना’ या सिनेमात काम केलंय. धोनी त्याच्या तमीळ चित्रपटात स्वतः काम करणार की नाही, याबाबतची माहिती मिळालेली नाही.. मात्र, तो या चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement