SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : 161 पदांवर होणार भरती

पुणे :

आधी कोरोना आणि मग इतर गोष्टींमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे अनेक महिने आणि एखादे वर्ष वाया गेले. अर्थात हा काळ त्यांना अभ्यासासाठी वापरता आला. मात्र आता अनेक दिवसांच्या कालांतराने एमपीएससीने भरती काढली आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांनी का होईना पण एक उत्तम संधी आली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. गट अ आणि गट ब संवर्गासाठी एमपीएससी आयोगाच्या वतीने जाहीरात काढण्यात आली आहे. ही जाहीरात अ आणि ब गटातील मिळून एकूण 161 पदांसाठी काढण्यात आली आहे.

Advertisement

विविध विभागातील विविध संवर्गातील पदे यामध्ये भरली जाणार आहेत. महाराष्ट्रातील 37 केंद्रावर ही परीक्षा होणार असून 21 ऑगस्ट 2022 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याची जाहिरात  https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 12 मे 2022 पासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 1 जून 2022 पर्यंत आहे.

 

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत गट ‘अ’ मधील 59 तर गट ब मध्ये 14 पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय इतर 88 पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षा ऑगस्टमध्ये पार पडल्यानंतर मुख्य परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेण्यात येणार आहे.

Advertisement