SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजीराजेंना प्रवेश नाकारला

तुळजापूर : 

खासदार संभाजीराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज असून मराठा आरक्षणात त्यांनी आक्रमक व ठाम भूमिका घेतलेली आहे. आता खासदारकीची टर्म संपल्यावर ते नवीन पक्ष काढणार की काय?, अशी चर्चा सुरु होती. अशातच त्यांनी सुरु केलेल्या दौऱ्यात ते तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्याने गाभाऱ्यात प्रवेश नाकारला. मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी संभाजीराजांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे संभाजीराजे संतप्त झाल्याचे दिसून आले आहे. मंदिरातून बाहेर पडताना संभाजीराजें चा एक व्हिडिओ समोर आलाय.

Advertisement

या व्हिडीओमध्ये ते रागात बोलताना दिसत आहेत. “आमचा पहिला अभिषेक होता आणि आम्हालाच गाभाऱ्यात प्रवेश नाही? उद्या परत फोन करतो”, असं संभाजीराजे बोलताना दिसत आहेत. दरम्यान त्यांचा हा अपमान समस्त मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या बांधवाना जिव्हारी लागला आहे.

खासदार संभाजीराजे भोसले यांचा केलेला अवमानाचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाने थेट तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. “संभाजीराजे भोसले तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असता कुठलाही प्रोटोकॉल न पाळता त्यांना दर्शन घेण्यासाठी सह-जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी गाभाऱ्यात येण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं. या कारवाईची प्रत द्यावी. अन्यथा दप्तर दिरंगाई कायद्यानुसार वाट पाहून बोंब मारो आंदोलन करण्यात येईल”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement

आता पुढे काय होणार? संभाजीराजे काय भूमिका घेणार? संभाजीराजेंना नेमका का प्रवेश नाकारण्यात आला? अशा विविध प्रश्नांकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement