देशात महागाईचे सावट असताना सोने (Gold ) आणि चांदीच्या (Silver) मागणीत वाढ होत आहे. सोने-चांदीच्या खरेदीबाबत ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार केला असेल तर लग्नसराईत सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण होत आहे. असे असताना घरातून बाहेर पडण्यापूर्वी आजचे ताजे दर जाणून घ्या.
आज बुधवारी सोने या मौल्यवान धातूची किंमत (Gold Price) 51,050 रुपये झाली असून चांदीच्या दरातही (Silver Price) घसरण होऊन 60 हजार 733 रुपये प्रति किलोवर चांदीचे भाव आले आहेत.
IBJA च्या दरानुसार, 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 41,350 रुपयांना मिळत आहे. सहसा महागाईमुळे ज्यांना 22 कॅरेट सोने वापरण्यास अधिक खर्चिक वाटत असेल ते या सोन्याच्या दागिनांचा देखील वापर करू शकतात. हे तुम्हाला त्यापेक्षा स्वस्त वाटेल. खालील दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग शुल्काचा समावेश नाही, त्यामुळे तुम्ही स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन अचूक भाव जाणून घेऊ शकता, त्या भावात किंचित फरक असू शकतो.
IBJA च्या प्राप्त दरानुसार..
▪️ 24 कॅरेट सोने 51,050 प्रति 10 ग्रॅम
▪️ 22 कॅरेट सोने 50,352 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ 20 कॅरेट सोने 45,430 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ 18 कॅरेट सोने 41,350 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ 14 कॅरेट सोने 32,920 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ आज चांदी 60,733 प्रति किलो दराने विकली जात आहे.
किती कॅरेटचे सोने, कसे ओळखावे..?
सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेटनुसार प्रकार पडतात. हॉलमार्क बनवले जाते. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 958, 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 916, 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 750 असं लिहिलेलं असतं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy